Obesity Curve | भारताची तरुणाई लठ्ठपणाच्या विळख्यात, धडकी भरवणारा जागतिक रिपोर्ट समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Obesity Curve | आपला भारत जसजसा प्रगती करत चालला आहे. तसतसे आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मानवाच्या शरीराला मात्र खूप चांगला आराम मिळताना दिसत आहे. त्यामुळे माणसाची जीवनशैली देखील मोठ्या प्रमाणात बदलून गेली आहे. अगदी त्यांच्या खाण्यापण्याचा वेळा, काम त्याचप्रमाणे इतर बैठेकामामुळे त्यांच्या जीवनशैलीत बराच बदल झालेला आहे. याबरोबर व्यायामाचा अभाव, सतत मोबाईल वापरणे किंवा स्क्रीनवर जास्तीत जास्त वेळ घालवणे या सगळ्यामुळे भारताला सध्या लठ्ठपणाच्या (Obesity Curve) विळख्याने घेतलेले आहे. भारतात आजकाल जास्तीत जास्त लोक हे लठ्ठ होत चाललेले आहे. यांना लॅन्सेटचा यांनी एक धक्केदायक आकडेवारी समोर आणलेली आहे.

काय आहे लॅन्सेटचा अहवाल | Obesity Curve

या अहवालानुसार भारत हा लठ्ठपणाच्या विळख्यात अडकत चालल्याचे दिसत आहे. खास करून तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण सर्वाधिक वाढलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत हा लठ्ठपणा आणि त्यामुळे होणारे विविध आजारांनी ग्रासलेला लोकसंख्येचा देश असण्याची भीती देखील या अहवालात त्यांनी सांगितलेली आहे. आजकाल पाहिले तर भारतात सर्वाधिक हृदय विकार मधुमेह यांसारखे आजार लोकांना आहे. लोकांचा लठ्ठपणा वाढला की, आपोआप यांसारख्या आजारांचे प्रमाण देखील शरीरात वाढते आज पाहिले तर किशोरवयीन मुलांमध्ये देखील लठ्ठपणा वाढीस लागलेला आहे.

लठ्ठपणाची आकडेवारी

1990 मध्ये भारतात लठ्ठपणाचे (Obesity Curve) प्रमाण हे 1.2% होते जनगण 2022 मध्ये 9.8% वाढलं होतं 1990 मध्ये पुरुषांचे जाड होण्याचे प्रमाण हे 0.5% होते, तर 2022 मध्ये पुरुषांचे लठ्ठ होण्याचे प्रमाण हे 5.4% झाला आहे मुलींचे लठ्ठ होण्याचे प्रमाण 1990 मध्ये 0.1% होते तर 2022 मध्ये 3.1% झालेली आहे.

जगभरात एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठ

त्यांनी सादर केलेल्या अहवालात जागतिक अंदाजानुसार जगभरात सध्या 1 अब्जाहून अधिक लोक लठ्ठ आहेत 2022 चे आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जगातील लठ्ठ लोकांमध्ये 88 कोटी 15.9% मुलांचा समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा म्हणजे चरबीचा एक असामान्य किंवा जास्त संचय आहे. ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होतो. बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय म्हणजे उंचीच्या प्रमाणातला वजन जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनुसार 25 पेक्षा जास्त बीएमआय असेल, तर तुम्हीओव्हरवेट असता म्हणजेच तुमचं वजन हे गरजेपेक्षा जास्त मानलं जातं.

तरुण वयात लठ्ठपणा का वाढला आहे ?

मद्रास डायबिटीस रिसर्च डॉक्टर गुहा प्रदीप यांनी याबाबत सांगितले की, आत्ता लोक फळ, फळभाज्या, पालेभाज्या डाळी, कडधान्य या गोष्टींपासून खूप लांब आहेत. या ऐवजी ते बाहेरचे जास्त पदार्थ खातात बेकरीयुक्त पदार्थ खातात. त्यामुळे त्यांच्या चरबीचे प्रमाण देखील वाढले आहे. या सर्व चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे, शारीरिक हालचाली नसणे बैठकी जीवनशैली, जास्त प्रथिने न मिळणे यासारख्या कारणांमुळे लठ्ठ होत चालली आहे. (Obesity Curve)

त्याचप्रमाणे व्यायाम, सूर्यनमस्कार यांसारख्या गोष्टी करायला आजकाल कोणालाही वेळ नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे.. त्यासाठी आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांना बस किंवा कारमधून खेळायला नेण्याऐवजी त्यांनाच पायी चालत घेऊन जाणे. त्याचप्रमाणे घरात मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट देण्यापेक्षा मैदानी खेळ खेळायला सांगावे या गोष्टींकडे आई-वडिलांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.