2 बसची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 10 ठार, 8 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशात रेल्वे अपघातानंतर आता बसचा भीषण अपघात घडला आहे. दोंन्ही बस समोरासमोर येऊन जोरदार धडक बसली. रात्री १ वाजता हा अपघात झाला असून यामध्ये आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी कि, बेरहामपूरमध्ये लोकल मिनी बस आणि ओएसआरटीसी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला तर ८ जण जखमी झाले. ओएसआरटीसीची बस रायगडाहून भुवनेश्वरच्या दिशेने जात होती. तर दुसरीकडे, खंडाडेउली गावातील एक कुटुंब त्यांच्या वधूला तिच्या सासरच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. लग्नसोहळ्यानंतर सर्वजण मिनी बसने घरी परतत होते. याचवेळी या मिनी बसची विरुद्ध दिशेने येणाऱ्या ओएसआरटीसी बसला धडक बसली आणि मिनी बस पलटी झाली.

या भीषण अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व मृत आणि जखमी लोक हे मिनी बस मधील आहेत तर OSRTC बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातातील मृतांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आहे . या अपघाताची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.