Odysse HyFy Electric Scooter : फक्त 42 हजारांत लाँच झाली Electric Scooter; देतेय 90KM रेंज

Odysse HyFy Electric Scooter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Odysse HyFy Electric Scooter । भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी चांगलीच वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा खरंच वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीला जास्त प्राधान्य देत आहे. वाढती मागणी बघता मार्केट मध्येही जवळपास सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या आपली वाहने इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये घेऊन येत आहेत. परंतु इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत हि तुलनेनं जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही ती खरेदी करू शकत नाहीत…. कारण ग्राहकांना कमी पैशात आणि परवडणाऱ्या किमतीत गाडी हवी असते. तुम्ही सुद्धा स्वस्तात मस्त आणि नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याच्या विचारात तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. Odysse Electric Vehicles ने बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. HyFy असं या स्कुटरचे नाव असून तिची किंमत फक्त ४२ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे किंमत कमी असली तरी ती तब्बल 90 किलोमीटर रेंज देतेय. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स जाणून घेऊयात…..

रेंज किती? Odysse HyFy Electric Scooter

या इलेक्ट्रिक स्कुटरचे वजन ८८ किलो असून ती १५० किलो पर्यंत लोड कव्हर करू शकते. Odysse HyFy इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये २५० वॅटची मोटर बसवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये २ बॅटरी देण्यात आल्या आहेत ज्याची पॉवर ४८V आणि ६०V आहे. कंपनीचा दावा आहे की, हि बॅटरी एकदा फुल्ल चार्ज करण्यासाठी ४ ते ८ तास लागू शकतात. परंतु एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ती तब्बल ७० ते ९० किलोमीटर पर्यतचे अंतर आरामात पार करू शकते.

अन्य फीचर्स –

Odysse HyFy इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (Odysse HyFy Electric Scooter) सिटी ड्राइव्ह, पार्किंग आणि रिव्हर्स मोड असे ४ मोड देण्यात आले आहेत. त्यात क्रूझ कंट्रोल आणि डिजिटल एलईडी मीटर देखील बसवण्यात आले आहे जे बॅटरीची स्थिती, वेग आणि मोड्सबद्दल माहिती देते. स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड रियर सस्पेंशन मिळते. यात समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक आहेत.

किंमत-

Odysse HyFy इलेक्ट्रिक स्कूटरची (Odysse HyFy Electric Scooter) किंमत फक्त ४२,००० रुपये (एक्स-शोरूम मुंबई) आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर पाच रंगांमध्ये लाँच केली आहे ज्यामध्ये रॉयल मॅट ब्लू, सिरेमिक सिल्व्हर, ऑरोरा मॅट ब्लॅक, फ्लेअर रेड आणि जेड ग्रीन रंगांचा समावेश आहे. तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील रायडर्ससाठी ही स्कुटर बेस्ट पर्याय ठरेल. आज १० मे २०२५ पासून Odysse HyFy इलेक्ट्रिक स्कुटरची विक्री सुरू होईल. Odysse डीलरशिप किंवा देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या स्कुटरची खरेदी करू शकतात. कंपनी सुरुवातीच्या काही ग्राहकांना डिस्काउंट पण ऑफर करत आहे.