Odysse Vader : 999 रुपयांत करा बुक ‘ही’ Electric Bike; 125 किमी रेंज अन् बरंच काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे गेल्या वर्षभरात अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ग्राहकांच्या या वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथील टू व्हिलर उत्पादक कंपनी Odysse Electric Vehicles ने आज आपली Odysse Vader ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. कंपनीने या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये ठेवली आहे. मात्र कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही फक्त 999 रुपये टोकन रक्कम भरून ही बाईक बुक करू शकता. चला तत्पूर्वी या गाडीची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया….

Odysse Vader

125 किलोमीटरपर्यंत रेंज –

कंपनीने या बाईकमध्ये 3.7 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. हि बॅटरी 3 kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 6 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. या गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळपास तास लागतात आणि एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 125 किलोमीटरपर्यंत धावू शकते असा कंपनीचा दावा आहे. तसेच या बाईकचे टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे.

Odysse Vader

फीचर्स – Odysse Vader

गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसह 7-इंचाचे इन्स्ट्रुमेंट पॅनेल मिळते. तसेच अॅप आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे ते नियंत्रित केले जाऊ शकते. या बाइकमध्ये एलईडी लाइटिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील मिळते. ब्रेकिंगसाठी, या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS), 240mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 220mm रियर डिस्क ब्रेक आहे. यामध्ये उपलब्ध असलेले Odysse EV अॅप बाईक लोकेटर, जिओ फेंस, इमोबिलायझेशन, अँटी थेफ्ट, ट्रॅक आणि ट्रेस आणि कमी बॅटरी अलर्ट यांसारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स देतात. 128 किलो वजनाच्या या बाईकच्या कर्ब वजनासह, Vader इलेक्ट्रिक बाइक 18 लिटर स्टोरेज स्पेस देते.

Odysse Vader

 

किंमत –

Odysse Vader इलेक्ट्रिक बाइक ब्लू, रेड, ब्लॅक, ग्रीन आणि मिस्टी ग्रे या एकूण 5 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये ठेवली आहे. Odysse Vader या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ग्राहकांना उपलब्ध होणार असून कंपनीच्या अधिकृत डीलरशिप किंवा वेबसाइटवर 999 रुपये टोकन रक्कम भरून ही बाईक बुक करू शकता.