मामाने स्वयंपाक करण्यास सांगितल्यावर भाच्याने चिडून केले ‘हे’ काम

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चाकण : हॅलो महाराष्ट्र – मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील अमृतनगर भागामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मामाने भाच्याला चपात्या बनवण्यास सांगितल्याने भाच्याने भाजी कापण्याच्या चाकूने मामावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.

आरोपी व्यक्तीचे नाव सचिन विलास देसाई आहे. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव गजानन सुरेश खैरे असे आहे. गजानन सुरेश खैरे यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेदनकरवाडी येथील अमृतनगर येथे गजानन खैरे भाड्याच्या खोलीत आपला भाचा सचिन विलास देसाई याच्यासोबत राहतात. शुक्रवारी रात्री स्वयंपाक करण्याच्या वेळी मामा गजानन यांनी भाचा सचिन याला चपात्या बनविण्यास सांगितले. यानंतर भाचा सचिन खूप चिडला. त्याने चपात्या बनविण्यास नकार दिला. यानंतर त्याने भाजी कापण्याच्या चाकूने मामा गजानन यांच्या पोटावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर पोलिसांनी भाचा सचिन देसाई याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलिस करत आहेत.