OICL AO Recruitment 2024 | ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीअंतर्गत नोकरीची संधी, 100 पदांसाठी भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

OICL AO Recruitment 2024 | आज-काल अनेक शिकलेल्या विद्यार्थ्यांना देखील चांगली नोकरी मिळत नाही. किंवा अनेकवेळा त्यांना नोकरीचे पर्याय देखील माहित नसतात. आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या विविध संधी पोहोचवत असतो. जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरसाठी त्याचा फायदा होईल. अशाच आता आम्ही एक नवीन अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मेगाभरतीला सुरुवात झालेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीकडून ही भरती प्रक्रिया राबवली आहे जात आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

लोकांच्या भरतीबद्दल त्यांनी अधिसूचना देखील जाहीर केलेली आहे. प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती चालू सुरू आहे. थेट ओरिएंटल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आता तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. या भरती प्रक्रियेत तब्बल 100 रिक्त जागा असणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि या भरतीसाठी अर्ज करा.

ही भरती प्रक्रिया (OICL AO Recruitment 2024) 21 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे 12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी तुम्हाला वेबसाईटला अर्ज करावा लागणार आहे उशिरा केलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाही.

रिक्त जागा तपशील | OICL AO Recruitment 2024

  • लेखा विभाग – 20 पदे
  • ऍक्चुअरीची विभाग – 5पदे
  • अभियंता – 15 पदे
  • आयटी अभियंता – 20पदे
  • विधी – 20 पदे
  • वैद्यकीय अधिकारी -20 पदे

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकरात वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज भरायचे आहेत. लक्षात ठेवा 12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा