हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लहान मुले असो की मोठी माणसे सर्वांनाच भाज्यांमध्ये भेंडी (Lady Finger) खायला आवडते. मसाल्याची भेंडी असो किंवा काप केलेली भेंडी असो ती चवीला चांगलीच लागते. भेंडीच्या याच उत्पादनाला उन्हाळी हंगामामध्ये चांगली मागणी असते. या काळात भेंडी जास्त खपली जाते. त्यामुळे शेतकऱ्याला याचा दुपटीने फायदा होतो. आज आपण याचं भेंडीची लागवड कशी करायची याविषयी जाणून घेणार आहोत.
जमीन, हवामान कसे असावे?
कधीही उष्ण हवामान भेंडीच्या पिकाला चांगले मानवते. काळया जमिनीमध्ये ते हलक्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची भेंडी चांगल्या पद्धतीने वाढ करते. तसेच, सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीमध्ये भेंडीची वाढ योग्य पद्धतीने होते.
भेंडीच्या जाती
चांगल्या उत्पादनासाठी कोकण आणि परभणी भागात क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय, पंजाब ७, विजया, वर्षा उपहार, परभणी भेंडी, फुले अशा भेंडीची लागवड करण्यात येते. या भेंडीमधून चांगले उत्पादन देखील मिळून जाते.
लागवड करण्याची पद्धत
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भेंडीची लागवड करावी. 45 बाय 12 सेंटिमीटर अंतरावर अशा अंतरावर ही लागवड करण्यात यावी. यासाठी 8 ते 10 किलो बियाणे पुरेसे असतात. ही बियाणे रुजत घालण्यापूर्वी पाण्यात किंवा सायकोसीलच्या 24 तास भिजवून ठेवावीत. नंतर बियाणे कोरडी करून ती मातीत पुरावीत. यामुळे उत्पन्न दहा ते पंधरा टक्के अधिक वाढते.
भेंडीची काढणी
फळे कोवळी असतानाच भेंडीची काढणी करावी. झाडाला फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर ही फळे काढण्यासाठी तयार होतात. परंतु बदलत्या हवामानामुळे भेंडीवर वेगवेगळ्या रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे भेंडीची व्यवस्थित काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते तिथे भेंडी चांगली येते. आई उत्पन्न देखील त्यातून चांगले मिळते.