पुणेकरांचा प्रवास महागला; कसे असतील नवे दर? चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यास ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे शहरात येणारे पर्यटकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. दरवर्षी लाखो पर्यटक पुण्यात येत असतात आणि विविध ठिकाणांना भेट देत असतात. पुण्यातील सारसबाग, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक Ola, Uber सारख्या सुरक्षित वाहनांचा वापर करतात. ते त्यांना अधिक सोयीचे व खिशाला परवडणारेही वाटते. परंतु Uber आणि Ola ने आपले दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हें नवे दर नेमके किती असतील ते जाणून घेऊयात.

का वाढवले दर?

पुण्यामध्ये उबर आणि ओलाचे दर वाढवण्यात आले आहेत. कारण, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एसी कारच्या भाडे दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने  मंजुरी दिली आहे. हा निर्णय खटुआ समितीच्या शिफारशीनुसार तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार हा घेण्यात आला आहे. मात्र असे असले तरी यातील दिलासादायक बाब म्हणजे काळी- पिवळी टॅक्सीच्या दरातील वाढ ही पूर्वीप्रमाणेच असणार आहे. म्हणजेच पहिल्या दीड किलोमीटर साठी 31 रुपये तर त्यानंतरच्या किलोमीटर साठी 21 रुपये असणार आहे.

कसे असतील दर?

पुण्यात वाढलेल्या एसी कारच्या भाड्यामुळे ओला आणि उबरलाही आपले भाडे वाढवावे लागणार आहेत. यामधील भाडे दर पाहायला गेलं तर एसी कारसाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी 37 रुपये तर तिथूनपुढच्या प्रवासासाठी  प्रत्येक किलोमीटर प्रमाणे 25 रूपये मोजावे लागणार आहेत. तर काळी – पिवळी टॅक्सीच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाश्यांना काळी – पिवळीचा पर्याय हा परवडणारा असेल. या दराबाबतची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या भाडे दरामुळे पुणेकरांच्या तसेच येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला चाप बसणार आहे.