Thursday, October 6, 2022

Buy now

Ola सादर करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार; 15 ऑगस्टचा मुहूर्त साधणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनाच कल आता इलेक्ट्रिक वाहनाकडे वळला आहे. अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात सादर करण्यासाठी सज्ज आहे. 15 ऑगस्ट ला म्हणजेच भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करेल .

ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सूचक संकेत दिले आहेत . त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल 15 ऑगस्ट रोजी कंपनी आपल्या नवीन उत्पादनाची घोषणा करण्यास उत्सुक आहे आणि कंपनीच्या भविष्यातील योजनांबद्दल अनेक माहिती देखील शेअर केली जाईल. त्याची लाईव्हस्ट्रीम वेळ आणि लिंक लवकरच शेअर केली जाईल असे ते म्हणाले. कंपनीने अद्याप आगामी इलेक्ट्रिक कारचे वैशिष्ट्य जसे की पॉवर, श्रेणी, बॅटरी आणि चार्जिंग टाइम याबाबत अधिकृत माहिती सादर केली नाही. याबद्दल अधिक माहिती येत्या काळात समजेलच.

जूनच्या सुरुवातीला, ओला इलेक्ट्रिकने आपल्या आगामी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाची एक झलक दाखवली होती. अग्रवाल यांनी सांगितले होते की, उत्पादनाबाबत अधिक तपशील १५ ऑगस्ट रोजी समोर येतील. इलेक्ट्रिक वाहन विभागातील ग्राहकांसाठी सर्वोत्कृष्ट उत्पादने विकसित करण्यासाठी त्यांनी वचनबद्ध केले. दरम्यान, ओला इलेक्ट्रिक सध्या 4-चाकी वाहनांसाठी सुविधा उभारण्यासाठी 1,000 एकर जागा शोधत आहे. हा कारखाना Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या होसूर येथील सध्याच्या कारखान्यापेक्षा खूप मोठा असेल.