Ola Electric Motorcycle | सध्या इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चालत आहे. अनेक लोक हे डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या घेण्याऐवजी आता इलेक्ट्रिक गाड्या घेत आहेत. आता या सेगमेंटमध्ये ओला देखील इलेक्ट्रिक बाइकमध्ये त्यांचे आढळ स्थान निर्माण करणार आहे. ती म्हणजे आता ओलाने इलेक्ट्रिक बाइक ग्राहकांसाठी बाजारात लॉन्च करणार आहे. ओला कंपनीचे (Ola Electric Motorcycle) सीईओ आणि संस्थापक भावीश अग्रवाल यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिलेली आहे. या आधीओला कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केली होती. त्यामुळे खूप मोठा धमाका झाला होता. परंतु आता त्यांच्या बाईकमध्ये नक्की काय वैशिष्ट्य असणार आहे? काय फीचर्स असणार आहेत? या गोष्टीची माहिती आपण जाणून घेऊया.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या इमेजमध्ये एक बॅटरी दिसत आहे. ज्याबद्दल सगळेजण असा अंदाज लावत आहे की, बॅटरी व्हायब्रंटच्या आगामी ओला इलेक्ट्रिक मोटरसायकलची असू शकते. काही काळापूर्वी या कंपनीने सांगितले होते की कंपनी हायमेंडहेड, रोडस्टर एडवेंचर आणि क्रूजर या चार इलेक्ट्रिक बाइक्स मॉडेलवर देखील काम करत आहेत.
ही इमेज शेअर करत भाविश अग्रवाल यांनी वर्किंग ओन समथिंग असे कॅप्शन देखील दिलेले आहे. त्यामुळे आता सगळ्यांमध्ये उत्साहते वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या वर्षी ओलाने पहिली कन्सेप्ट बाईक प्रदर्शित केली आणि त्याचवेळी कंपनीने 2024 मध्ये काहीतरी नवीन आणि खास लॉन्च करू असे देखील सांगितले होते.
सीईओ भाविश यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये शक्तिशाली बॅटरी पॅक दिसत आहे. जी आकाराने खूप मोठी दिसते. यासोबतच इथे स्प्रकिटचेनही दिसत आहे. त्यामुळे ओलाची ही बाईकखूप सुंदर असू शकते, असे सगळेजण अंदाज लावत आहे. त्यामुळे आता येत्या 15 ऑगस्ट रोजी ओला ही त्यांची बाईक बाजारात लॉन्च करू शकते. असे देखील सगळेजण अंदाज लावत आहेत.