Ola Electric Share । इलेक्ट्रिक टू व्हीलर वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आइपीओ बाजारात लिस्ट होताच कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. अचानक शेअर्सच्या किमतीत वाढ झाल्याने खरेदीदार या शेअर्सवर तुटून पडलेत. ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स NSE वर 76 रुपयांच्या किमतीत लिस्टेड झाले होते, ही त्याची इश्यू किंमत होती. मात्र , यानंतर शेअर्सने प्रथम 11 टक्क्यांनी उसळी घेतली आणि नंतर 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला धडक दिली. सध्या ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सची किंमत 91.20 रुपये आहे.
खराब लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ – Ola Electric Share
खराब लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. सकाळी 10.11 वाजता ते 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह बीएसईवर 84.14 रुपये आणि एनएसईवर 84.21 रुपयांवर व्यवहार करत होते. १०.२७ मिनिटांनी हा शेअर ८७ च्या पुढं गेला. यानंतर यामध्ये आणखी वाढ झाली असून सध्या ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सची किंमत 91.20 रुपये आहे. ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सध्याच्या पातळीपासून खाली येतील असे वाटत नाही. (Ola Electric Share)
ओला इलेक्ट्रिकचा IPO 2 ऑगस्ट रोजी उघडण्यात आला आणि 6 ऑगस्ट 2024 पर्यंत खुला राहिला. कंपनीचा प्राइस बँड 72 ते 76 रुपये निश्चित करण्यात आला होता. या प्राइस बँडनुसार कंपनीचे मूल्यांकन ३३,५२२ कोटी रुपये होते. कंपनीने या IPO मध्ये 5,500 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला होता. कंपनीने IPO चा लॉट साइज १९५ शेअर्सवर निश्चित केल्याने अर्थ गुंतवणूकदाराला किमान 195 इक्विटी शेअर्स घ्यावे लागले. त्यामुळं किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ८२० रुपयांची गुंतवणूक करावी लागली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर ७ रुपयांची सूट देण्यात आली होती. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी ही पहिली भारतीय इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे जिचा IPO आलाय.