Ola Scooter Discount : भारतात इलेक्ट्रिक गाडयांना ग्राहकांनाही मोठी पसंती मिळत आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यातच इलेक्ट्रिक गाड्या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने तरुणाईमध्ये या गाड्यांचे चांगलंच वेड आहे. खास करून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच OLA, Ather, Bajaj, या कंपन्यांच्या गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही सुद्धा प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी OLA ची स्कुटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ग्राहकांनो हीच ती खरेदीची वेळ आहे. कारण OLA ने आपल्या गाड्यांच्या किमती तब्बल २५ हजारांनी कमी केल्या आहेत.
कोणत्या स्कुटरची किंमत किती ? Ola Scooter Discount
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये लोकांनी कोणताही संकोच करू नये आणि मोठ्या प्रमाणावर गाड्या खरेदी कराव्यात यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. त्यानुसार ओलाच्या प्रत्येक स्कुटरवर ग्राहकांना २५ हजार रुपयांची देण्यात येत आहे. मात्र ही ऑफर फेब्रुवारी पर्यंतच असणार आहे, त्यानंतर स्कूटरच्या किमती कंपनीने ठरवल्याप्रमाणेच असतील. त्यामुळे ग्राहकांनो, जास्त उशीर करू नका. Ola S1 X+ ची किंमत 1.09 लाख रुपये होती जी आता या डिस्काउंटच्या माध्यमातून अवघी 84 999 रुपये झाली आहे. Ola S1 Air मॉडेलची किंमत 1.19 लाख रुपयांवरून 1. 05 लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय, Ola S1 Pro मॉडेलची किंमत आधी 1.48 लाख रुपये होती, जी डिस्काउंटनंतर (Ola Scooter Discount) केवळ 130 लाख रुपये झाली आहे.
You asked, we delivered! We’re reducing our prices by upto ₹25,000 starting today for the month of Feb for all of you!! Breaking all barriers to #EndICEage!
— Bhavish Aggarwal (@bhash) February 16, 2024
Valentine’s Day gift for all our customers 🙂❤️🇮🇳 pic.twitter.com/oKFAVzAWsC
या डिस्काउंट व्यतिरिक्त OLA ने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर रेंजवर 80,000 किमी किंवा 8 वर्षांपर्यंत विस्तारित वॉरंटी देखील जाहीर केली आहे. यापूर्वी हीच वॉरंटी 40,000 किमी किंवा 3 वर्षे होती. ग्राहकांना आपल्याकडे अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी ओला फायनान्स ऑप्शन सुद्धा देत आहे. यामध्ये नो कोस्ट ईएमआय, झिरो डाउनपेमेंट सहित ७.९९ टक्के व्याजदर या ऑफर्सचा समावेश आहे.