अंगावर दगडी भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू; 3 गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये कुडाळ भागात गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे बऱ्याच भागात छोटे मोठे नुकसान होत आहेत. त्यातच पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाच्या या तडाख्यात दहा फूट उंचीची दगडी भिंत कोसळली व भिंतीच्या शेजारी बसलेल्या प्रभावती मतकर , मुक्ताबाई महामुलकर, कुसुम महामुलकर, पद्मावती महामुलकर यांच्या अंगावर दगडी भिंतीचा मलमा कोसळल्याने चारही महिला भिंतीखाली गाडल्या गेल्या यातच कुसुम महामुलकर (वय 70) यांचा डोक्यात मोठमोठाली दगडी पडून जागीच मृत्यू झाला अन्य 3 महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्या

यावेळी अचानकच गावात मोठा आवाज आल्याने युवकांनी धाव घेतली. घटना स्थळी पाहिल्यानंतर दहा फूट उंचीची उंच दगडी भिंत खोलीच्या आतील बाजूस कोसळली होती व यामध्ये मलब्याखाली गाडले गेलेल्या महिलांचा मोठ-मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. स्थानिक युवकांनी भिंतीखाली गाडल्या गेलेल्या तीन महिलांना दगड माती बाजूला काढून मोठ्या शर्तीने बाहेर काढले.

मात्र अंगावर सहा ते सात फूट दगड मातीचा मलमा पडलेल्या कुसुम महमूलकरला काढण्यात युवकांना वेळ लागला. बाहेर त्यांना काही वेळेतच काढल्यानंतर त्या गंभीर स्वरूपामध्ये जखमी झाल्या होत्या. बेशुद्ध अवस्थेत होत्या. यानंतर सर्व युवकांनी मिळून तात्काळ चारीही जखमी महिलांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारासाठी नेत असतानाच कुसुम महामुलकर यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.