हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Himba Tribe) संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात. ज्यांच्या विषयी विविध गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये आदिवासी जमातीचा देखील उल्लेख आहे. त्यांचं राहणं, खाणं पिणं, सगळं काही इतर जमातींपेक्षा फार वेगळ आणि आश्चर्यकारक आहे. आजही आपण अशाच एका जमाती विषयी जाणून घेणार आहोत. जे पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अशी प्रथा जपत आहेत ज्याविषयी जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
आंघोळी बाबत विविध लोकांचे विविध समज असू शकतात. कोणी थंड पाण्याने, तर कोणी गरम पाण्याने अंघोळ करत असेल. तर काही लोक कडकडीत गरम पाणी किंवा अगदी बर्फाच्या पाण्याचा वापर करूनसुद्धा आंघोळ करत असतील. एकंदर काय, तर शारीरिक स्वच्छता महत्त्वाची. प्रत्येकाच्या दिनचर्येत आंघोळ अत्यंत महत्वाचा भाग आहे. (Himba Tribe) पण आपण ज्या आदिवासी जमातीविषयी बोलत आहोत या जमातीतील लोकांमध्ये आंघोळीला बंदी आहे. ही गोष्ट जितकी विचित्र तितकीच सत्य आहे आणि या आदिवासी जमातीचे नाव हिंबा असे आहे.
हिंबा जमात (Himba Tribe)
जगात ठिकठिकाणी अनेक आदिवासी समुदाय राहतात. जे हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरांचे आजही अनुकरण करताना दिसतात या जमाती ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी यांचं वर्चस्व असतं. यापैकी एक हिंबा नावाची आदिवासी जमात ही आफ्रिका खंडात स्थित आहे. या जमातीची माणसं अंघोळ करत नाहीत.
मुख्य म्हणजे या जमातीत आंघोळ करण्यावर कठोर बंदी आहे. जाणून आश्चर्य वाटेल पण या जमातीतले लोक साधे कपडे धुण्यासाठीसुद्धा पाणी वापरत नाहीत. (Himba Tribe) हे अधिकाधिक वेळ शेतात घालवतात आणि तरीसुद्धा अंग स्वच्छ करण्यासाठी अंघोळ करत नाहीत. काही आख्यायिकानुसार, या जमातीतील स्त्रिया केवळ त्यांच्या लग्नादिवशी एकदाच आंघोळ करतात.
आंघोळ न करता ही राहतात स्वच्छ
आता साहजिक आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल हिंबा जमातीतले लोक जर आंघोळ करत नाहीत तर त्यांची शारीरिक स्वच्छता कशी राहते? तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हे लोक पाण्याने नव्हे तर रोग आणि जीव जंतूंपासून मुक्त राहण्यासाठी धुराने आंघोळ करतात. यांच्यातील महिला खाजगी स्वच्छतेसाठी खास पद्धतीचा अवलंब करतात.
(Himba Tribe) यासाठी औषधी वनस्पतींना पाण्यात उकळले जाते आणि त्यापासून येणारी वाफ शरीराची स्वच्छता करण्यासाठी वापरतात. तसेच उन्हापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हे लोक प्राण्यांची चरबी आणि हेमा टाईट या खनिजापासून तयार केले जाणारे एक खास मलम देखील वापरतात.