हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरूवात होणार आहे. यंदाची ओलीम्पिक स्पर्धा (Olympics 2024) सिटी ऑफ लाईट’ पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आली असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ब्रेकिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट क्लाइंबिंगसह अनेक खेळांचा समावेश आहे. भारताला सुद्धा यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत यशाची अपेक्षा आहे. यंदा भारताकडून ११७ खेळाडूंना ऑलिम्पिक साठी पॅरिसला पाठवण्यात आलं असून तिरंग्याचा मान उंचावण्याची जबाबदारी या खेळाडूंच्या खांद्यावर असेल. तुम्ही सुद्धा खेळाचे चाहते असाल तर ऑलिम्पिक स्पर्धा टीव्ही आणि मोबाईल वर कुठे आणि कशी बघायची ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कसे बघाल ऑलिम्पिक सामने ?
Viacom18 Media Private Limited (Viacom18) कडे भारतात तसेच उपखंडात पॅरिस ऑलिम्पिकचे (Olympics 2024) प्रसारण करण्याचे खास मीडिया अधिकार आहेत. फ्रान्सच्या राजधानीत होणारे उन्हाळी ऑलिम्पिक स्पोर्ट्स 18 वाहिनीवर टीव्हीवर पाहता येईल. तसेच दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनलवरही तुम्ही ऑलिम्पिक बघू शकत. जर तुम्हाला मोबाईलवर ऑलिम्पिकचे सामने मोबाईलवर बघायचे असतील तर जिओ सिनेमावरून विनामूल्य तुम्ही सामने बघू शकता.
किती वाजता ऑलिम्पिक बघता येईल? Olympics 2024
पॅरिस भारताच्या वेळेपेक्षा 3 तास 30 मिनिटे मागे आहे. ऑलिम्पिक अधिकृतपणे 26 जुलै रोजी सुरू होईल, तर फुटबॉल आणि रग्बी सेव्हन्स सामने 24 जुलै रोजी IST संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होतील. मात्र, ऑलिम्पिक संपेपर्यंत वेळापत्रक बदलू शकते.
भारतीय खेळाडूंची यादी पहा–
तिरंदाजी – दीपिका कुमारी, धीरज बोम्मदेवरा, प्रवीण जाधव, तरूणदीप राय, भजन कौर, अंकिता भगत.
ॲथलेटिक्स – नीरज चोप्रा, किशोर जेना, अब्दुल्ला अबुबकर, मोहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अक्शदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिष्ट, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पारूल चौधरी, ज्योती याराजी, किरण पहल, तेजिंदरपाल सिंग तूर, आभा खटुआ, अनु राणी, सर्वेश कुशारे, प्रवीण चित्रावेल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश, मिजो चाको कुरियन, विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूर्वम्मा, सुभा व्यंकटेशन, प्राची, सूरज पवार, जेसव्हिन एल्ड्रिन, किरण पाल.
बॅडमिंटन – पी.व्ही सिंधू, चिराग शेट्टी, सात्विक साईराज रेड्डी, एचएस प्रणय, लक्ष्य सेन, अश्विनी पोनप्पा, तनिशा क्रास्तो.
बॉक्सिंग – अमित पंघाल, निखत जरीन, लवलीना बोरगोहेन, जॅसमीन लबोडिया, प्रीती पवार, निशांत देव. इक्वेस्ट्रियन
(घोडेस्वारी) – अनुष अगरवाल.
गोल्फ – शुभांकर शर्मा, गगनजीत भुल्लर, अदिती अशोक, दीक्षा डागर.
हॉकी – गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश. बचावपटू : जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित, संजय. मध्यरक्षक : राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. आक्रमक : अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंग, गुरजंत सिंग.
नेमबाजी – मनू भाकर, ईशा सिंग, अंजुम मौदगिल, ऐश्वर्या प्रताप तोमर, राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग, अनंतजीत सिंग, रायजा धिल्लन, माहेश्वरी चौहान, संदीप सिंग, अर्जुन बाबौता, एलेनविले वालारिवन, रमिता जिंदाल, स्वप्नील कुसाळे, सिफ्ट कौर संगरा, रैझा धिल्लन. सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा.
सेलिंग – विष्णू सरवनन, नेत्रा कुमानन
टेबल टेनिस – शरत कमल, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, मानव ठक्कर, अर्चना कामत.
टेनिस – सुमित नागल, रोहन बोपन्ना, श्रीराम बालाजी.
कुस्ती – विनेश फोगाट, अंशु मलिक, अमन सेहरावत, निशा दहिया, रितीका हुडा, अंतिम पंघाल.
वेटलिफ्टिंग – मीराबाई चानू
पोहणे – धिनिधी देसिंगू, श्रीहरी नटराज
रोव्हिंग – बलराज रोव्हिंग
ज्युडो – तुलिका मान