Om Shaped Shiva Temple : देशातील ‘या’ ठिकाणी उभारण्यात आले ॐ आकाराचे शिव मंदिर; कलाकृतीचा अद्भुत नजराणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Om Shaped Shiva Temple) संपूर्ण देशभरात अनेक आश्चर्यकारक वास्तू, लेणी, परंपरा, तीर्थक्षेत्र आहेत. यांपैकी एक म्हणजे राजस्थानमधील पाली येथे वसलेले शिव मंदिर. या मंदिराला भव्य असे ओंकार स्वरूप लाभले आहे. त्यामुळे हे मंदिर अतिशय अद्भुत आहे. तुम्ही देशभरातील अनेक तीर्थक्षेत्र पाहिला असाल. मात्र पालीतील हे ओम आकाराचे शिव मंदिर सगळ्यांपेक्षा वेगळं आहे.

अद्भुत आणि दिव्य शिव मंदिर (Om Shaped Shiva Temple)

साधारण ४० वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र उत्साही श्री अलखपुरी सिद्धपीठ परंपरा प्रमुख महामंडलेश्वर महेश्वरानंद महाराज यांनी हे मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. लोकांना सनातन संस्कृती आणि योगविद्येशी जोडण्यासाठी त्यांनी या स्वप्नाला आकार दिला. जेव्हा एका परदेशी पर्यटकाने त्यांना सांगितले कि, त्याच्या भारत भेटीदरम्यान त्याला ताजमहाल पाहता आला नाही. ज्यामुळे त्याची सहल अपूर्ण राहिली. तेव्हाच श्री अलखपुरी सिद्धपीठ परंपरा प्रमुख महामंडलेश्वर महेश्वरानंद महाराज यांनी ओम आकाराचे मंदिर बांधण्याचा विचार केला.

‘या’ दिवशी पार पडणार उदघाटन सोहळा

या मंदिराची २३ जानेवारी १९९५ साली पायाभरणी करण्यात आली होती. (Om Shaped Shiva Temple) यानंतर आज एक दोन नव्हे तर तब्बल २८ वर्ष सतत काम केल्यानंतर या ओंकार स्वरूपी मंदिराने पूर्ण आकार घेतला आहे. येत्या १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान या मंदिराचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दिग्गज मंडळी आणि साधू महंत सहभागी होणार आहेत.

ओंकार स्वरूपाची रचना

ओम आकारातील हे शिव मंदिर सुमारे २५० एकरमध्ये पसरलेले असून या मंदिराच्या आत यज्ञवेदीसारखे दुमजली गुरुकुल आणि स्वस्तिकाच्या आकाराचे वसतिगृह बांधण्यात आले आहे. (Om Shaped Shiva Temple) विशेष म्हणजे हे एक योग मंदिर आहे. जिथे १०८ खोल्या, १२ ज्योतिर्लिंग आणि १००८ महादेवाच्या मूर्तीचे दर्शन घडते. संपूर्ण जगातील हे एकमेव ओम आकाराचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात कृत्रिमरीत्या डोंगर आणि तलाव तयार करण्यात आले आहेत. या भव्य ओंकार स्वरूपी शिव मंदिरासोबत इथे सप्तऋषींची समाधी देखील आहे.

पारंपरिक भारतीय शैलीत या मंदिराची वास्तू उभारण्यात आली आहे. या मंदिराचे शिखर १३५ फूट उंच असून सर्वात वरच्या भागात शिवलिंग आहे. या शिवलिंगावर ब्रह्मांडाची आकृती तयार करण्यात आली आहे. (Om Shaped Shiva Temple) या मंदिरातील आश्रमाच्या बांधकामासाठी ढोलपूरच्या बन्सी टेकडीवरून दगड आणण्यात आले आहेत. या मंदिर संकुलाच्या खाली २ लाख टन वजनाची टाकीही बांधण्यात आली आहे. अशा या अद्भुत आणि दिव्य ओंकार स्वरूपी मंदिराच्या उदघाटनाची जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्यात अनेक साधू, महंत आणि दिग्गज मंडळी सामील होणार आहेत.