BAPS Hindu Temple : UAE मधील पहिले हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज; जाणून घ्या खास वैशिष्ट्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BAPS Hindu Temple) संयुक्त अरब अमिरातीची (UAE – United Arab Emirates) राजधानी अबू धाबी येथे पहिले हिंदू मंदिर तयार करण्यात आले आहे. ज्याचे उदघाटन येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधील या पहिल्या हिंदी मंदिराच्या भव्य उदघाटन सोहळ्यासाठी दिग्गज मंत्री, अनेक संत आणि महंत पाहुणे अबूधाबीत पोहोचले आहेत. या मंदिराबाबत सांगण्यासारख्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. यामध्ये बांधकाम शैली, त्यासाठी वापरण्यात आलेले खडक, मंदिराची रचना आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. ज्याविषयी आपण जाणून घेऊया.

UAE मधील पहिले पारंपारिक हिंदू शैलीप्राप्त मंदिर (BAPS Hindu Temple)

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) राजधानीत म्हणजेच अबु धाबीत हे पहिलं हिंदू मंदिर बांधण्यात आलं आहे. एकूण २७ एकर जागेत उभारण्यात आलेलं हे मंदिर अत्यंत भव्य आणि पारंपारिक हिंदू स्वरूपाचे आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष UAE मधील या पहिल्या हिंदू मंदिराच्या उदघाटन सोहळा समारंभाकडे लागले आहे.

भारत – UAE मधील मैत्रीपूर्वक संबंध दर्शवणारे हिंदू मंदिर

UAE मधील या पहिल्या हिंदू मंदिराची रचना आणि बांधकाम हे पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. मध्य पूर्वेतील या भव्य BAPS हिंदू मंदिराचे बांधकाम दगडी स्वरूपाचे आहे. (BAPS Hindu Temple) अबू मुरीकाह जिल्ह्यात स्थित असलेली ही भव्य रचना भारत आणि UAE यांच्यातील मैत्रीपूर्वक संबंधांचा एक जिवंत पुरावा आहे. कारण या मंदिराचे बांधकाम प्रचंड काळजीपूर्वक, दोन्ही देशांच्या सांस्कृतिक परंपरा जपून करण्यात आले आहे. त्यामुळे हे मंदिर सांस्कृतिक सुसंवाद आणि क्रियाशील सहकार्याच्या भावनेचे प्रतीक आहे असे म्हणता येईल.

एका वृत्तानुसार, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी मंदिराबाबत काही खास माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि, ‘मंदिराच्या आतील बांधकामात ४०,००० घनफूट संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय मंदिराचे बांधकाम व्यवस्थापक मधुसूदन पटेल यांनी माहिती देताना सांगितले कि, ‘आमचा बांधकामा दरम्यान प्रवास नावीन्यपूर्ण होता आणि आम्ही अनेक आव्हानांवर मात केली. (BAPS Hindu Temple) आम्ही मंदिरासाठी उष्णता- प्रतिरोधक नॅनो टाइल्स आणि काचेच्या जड पॅनल्सचा वापर केला आहे.’ अंदाजानुसार, मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाला आहे.

UAE मधील BAPS हिंदू मंदिराची खास वैशिट्ये

UAE ची राजधानी अबूधाबीतील हे भव्य मंदिर मध्य पूर्वेतील पहिले पारंपरिक BAPS हिंदू मंदिर आहे. ज्याच्या बांधकामात राजस्थानी गुलाबी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे. तसेच बांधकामात उष्णता प्रतिरोधक नॅनो टाईल्स आणि काचेच्या जड पॅनल्सचा देखील वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे मंदिर आतून शीतल आणि आल्हाददायी राहील. मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड हे आधी भारतात कोरण्यात आले आणि त्यानंतर UAE मध्ये नेण्यात आले.

(BAPS Hindu Temple) हे BAPS हिंदू मंदिर एकूण २७ एकर जमिनीवर उभारण्यात आले आहे. ज्यासाठी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१५ साली झालेल्या दौऱ्यादरम्यान अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी १३.५ एकर जमीन दान दिली होती. पुढे २०१७ साली मोदींच्या हस्ते या मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. यानंतर UAE सरकारने जानेवारी २०२९ मध्ये आणखी १३.५ एकर जमीन दान दिली. अशा प्रकारे एकूण २७ एकर जमिनीवर या भव्य हिंदू मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

BAPS मंदिराची आणखी एक खासियत सांगायची म्हणजे, याचे सात स्पायर्स युएईच्या अमिरातीचे (अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम्म अल क्वैन, रास अल खैमा आणि फुजैराह) प्रतीक आहेत. तसेच या मंदिर संकुलात थीमॅटिक गार्डन, प्रार्थना हॉल, अभ्यास केंद्र आणि शिक्षण क्षेत्राचा समावेश आहे. या मंदिराच्या पायामध्ये भूकंपाची शक्यता आणि तापमान बदल तपासण्यासाठी १०० सेन्सर बसवण्यात आले आहेत. (BAPS Hindu Temple)