Private Train मध्ये आता प्रवाश्यांना मिळणार High-Tech सुविधा, Railway ने बनवला ड्राफ्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता देशात धावणाऱ्या खासगी रेल्वे गाड्यांमध्ये अनेक खास सुविधा देण्यात येतील. यात इलेक्ट्रॉनिक स्लाइडिंगचे दरवाजे, डबल ग्लेज्ड सेफ्टी ग्लास असणाऱ्याखिडक्या, ब्रेल सिग्नेज, एमरजंसी टॉक-बॅक मॅकेनिझम, पॅसेंजर सर्विलांस सिस्टम तसेच सूचना आणि डेस्टिनेशन बोर्ड यांचा समावेश आहे. रेल्वेने या खासगी गाड्यांचा आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत खासगी ऑपरेटरंकडून या गाड्यांसाठी अशा वैशिष्ट्यांची मागणी करण्यात आली आहे. रेल्वेने नुकताच हा आराखडा शेअर केला असून त्यात असे म्हटले आहे की, या गाड्या प्रवाशांना आरामदायी प्रवास देतील आणि ताशी 160 किलोमीटर वेगाने धावतील.

ताशी 180 किमी वेगाने खासगी गाड्या धावतील
रेल्वे ड्राफ्टमध्ये असे म्हटले आहे की, या गाड्यांची आखणी केली जाईल जेणेकरून चाचणी दरम्यान त्या जास्तीत जास्त 180 किमी / तास वेगाने सुरक्षितपणे काम करू शकतील. ही ट्रेन जास्तीत जास्त 140 सेकंदात शून्य ते 160 किमी वेग पकडण्यास सक्षम असावी. यात असे म्हटले आहे की या गाड्यांमध्ये एमरजंसी ब्रेक बसवले जातील जेणेकरुन 160 किमी / तास वेगाने प्रवास करताना त्या 1,250 मीटरपेक्षा कमी अंतरावर थांबवता येतील. या गाड्या अशा प्रकारे डिझाइन केल्या पाहिजेत की त्या 35 वर्षे धावतील.

ड्राफ्टमधील मुख्य मुद्दे:
रेल्वेच्या ड्राफ्टनुसार प्रत्येक कोचमध्ये कमीतकमी चार दरवाजे हे विजेद्वारे चालवले जाणे आवश्यक आहे. प्रत्येक बाजूला दोन दरवाजे असतील. त्यांच्यामध्ये सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था असेल आणि दरवाजे बंद होईपर्यंत ट्रेन चालणार नाही.

अशी यंत्रणा असावी की आपत्कालीन परिस्थितीत जर एखादी ट्रेन थांबली तर प्रवासी दरवाजा उघडून बाहेर येऊ शकतील. प्रत्येक कोचमध्ये आतून आणि बाहेरून प्रत्येक बाजूने मॅन्युअली दार उघडण्यासाठी एक प्रणाली असावी. सर्व खिडक्याना डबल ग्लेज़्ड सेफ्टी ग्लास असावेत.

या गाड्यांमध्ये किमान ध्वनी प्रदूषण असले पाहिजे तसेच प्रवासादरम्यान कंपने येऊ नयेत. सर्व दाराजवळ एमरजंसी बटणे आणि टॉक-बॅक फोन असावेत.

पॅसेंजर इनफॉर्मेशन सिस्टम मध्ये ऑटोमैटिक अनाउंसमेंट असावी आणि ट्रेनमध्ये डेस्टिनेशन विषयी हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेत डिस्प्ले होणे आवश्यक आहे. पॅसेंजर कोच सर्विलांस सिस्टम (पीआरएसएस) मध्ये आयपी आधारित सीसीटीव्ही नेटवर्क, सर्विलांस कॅमेरे आणि इतर सामान असावेत.

प्रवाशांना कव्हर करण्यासाठी प्रत्येक ट्रेन सिटिंग कोचमध्ये कमीतकमी 6 सर्विलांस कॅमेरे असले पाहिजेत. कॉरीडॉरला कव्हर करण्यासाठी स्लीपर ट्रेनमधील प्रत्येक कॉरिडोरमध्ये 2 सर्विलांस कॅमेरे असले पाहिजेत.

तसेच ड्रायव्हिंग कॅबमध्ये किमान एक कॅमेरा असणे आवश्यक आहे. जेणेकरून तो गर्दी, ट्रॅक आणि ओएचई परिस्थितीला पाहू शकेल. ट्रेनच्या बाहेरील बाजूसही कॅमेरे असावेत.

पॅसेंजर कार सर्विलांस सिस्टमसाठी प्रत्येक ड्रायव्हिंग कोचमध्ये एक इंटीग्रेटेड स्क्रीन असावी. याव्यतिरिक्त, प्रत्येक कोचमध्ये एमरजंसी टॉक बॅक सिस्टम असावी.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment