छ. उदयनराजेंच्या वाढदिसानिमित्त बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडीचा पहिला तर पुण्याचा दुसरा क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडी येथील संग्राम उदयसिंह पाटील (ज्योतिर्लिंग प्रसन्न) यांच्या गाडीने प्रथम तर पुणे- कळंबी येथील दिनेश भांडले (वाघजाई प्रसन्न) दुसरा क्रमांक पटकाविला. सातारा, सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील 300 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या बैलगाड्यांना छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते गाैरविण्यात आले.

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी बैलगाडा शर्यतीच्या मैदानाला भेट दिली यावेळी माजी आ. आनंदराव पाटील, राजेंद्रसिह यादव, हणमंतराव पवार, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव, नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, स्मिताताई हुलवान, बाळासाहेब यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, प्रीतम यादव, निशात ढेकळे, ओंकार मुळे, विनोद भोसले, राहुल खरडे तसेच कराड नगरपरिषद, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते.

बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे ः- प्रथम क्रमांक- ज्योतिर्लिंग प्रसन्न (ओगलेवाडी), दुसरा क्रमांक- वाघजाई प्रसन्न (पुणे- कळंबी), तिसरा क्रमांक- ईश्वरी चंद्रकांत शेलार, चौथा क्रमांक- बाबू माने (हरणीक), पाचवा क्रमांक- सोन्या शंभू ग्रुप, अमोल माने (नरसिंहपुर), सहावा क्रमांक- रमेश जाधव (सुपने), सातवा क्रमांक- भानुदास वगैरे (कासेगाव) या सातही गाड्यांना रोख रक्कम व छत्रपती चषक श्री. विजयसिंह यादव यांच्या हस्ते देण्यात आले. बैलगाडा शर्यतीसाठी राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव मित्रपरिवार व  संयोजक राजूभाऊ सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, जयवंतराव वीर- कायदे, नितीन भाऊ आवळे, पिंटू पाटील, योगेश पळसे, नरेश गुप्ता, योगेश कोरडे हे मैदान पारदर्शक होण्यासाठी परिश्रम घेतले. पंच म्हणून आबासाहेब जाधव, उदयसिंह पाटील, अशोक मदने, सागर धोकटे यांनी काम पाहिले.