विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर; आयोगाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 10 जूनला विधान परिषदेच्या (Legislative Council) मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणुका पार पडणार होते. परंतु आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षक मंडळाने केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निवडणुका नेमक्या कोणत्या तारखेला घेण्यात येतील, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यावर शिक्षक, पदवीधर संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. तसेच, या संघटनांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की, “शाळांना सुट्टी असल्यामुळे त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होईल. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात” या मागणीच्या आधारावरच आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सध्या विलास पोतनीस हे मुबंई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. कोकणात निरंजन डावखरे हे विद्यामान आमदार आहेत. यासह नाशिकच्या शिक्षक मतदार संघावर किशोरे दराडे विद्यमान आमदार आहेत. तसेच, कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. या सर्वांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. यामुळेच निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती.