कराड दक्षिणमध्ये 2024 ला “एकच बाबा, अतुल बाबा” : चंद्रशेखर बावनकुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड दक्षिणमध्ये 2024 ला अतुल बाबा आमदार होणार असल्याचे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले आहे. आता जिल्हाध्यक्षांनी आपली भावना मांडली ती गोष्ट खरी आहे. आपला विधानसभेचा नेता कसा असावा तर आपल्या समाजाचे प्रश्न सरकारमध्ये मांडणारा असावा. तर तो कसा असावा तर डाॅ. अतुल भोसले यांच्या सारखा असावा. तेव्हा आता एकच बाबा राहील ते म्हणजे अतुल बाबा राहील. दुसरे बाबा भाजपमध्ये नाहीत, त्यामुळे एकच बाबा अतुल बाबा असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले. काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना हे आव्हान दिले आहे.

नांदगांव (ता. कराड) येथे आयोजित कराड दक्षिणमधील धनगर समाजबांधवांचा भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पुण्याचे माजी महापाैर मुरलीधर मोहोळ, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, डाॅ. सारिका गावडे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयकुमार गोरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरण केले, त्याच्यामुळे आज आपण मास्कमुक्त बसलो आहे. कराड दक्षिणमध्ये कोरोना काळात डाॅ. अतुल भोसले आणि कृष्णा हाॅस्पीटलने लोकांना मदत केली. तेव्हा आताचे विद्यमान आमदार कुठे होते. त्यामुळे आगामी 2024 सालचा आमदार हा अतुल बाबाच असणार आहेत.

यशवंतरावांच्या समाधी स्थळावरून ऊर्जा घेऊन जात आहे
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कराड येथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यसोबत डॉ. अतुल भोसले, नरेंद्र पाटील, विनायक पावसकर यांच्यासह कराड शहरातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यशवंतरावांच्या समाधी स्थळावरून ऊर्जा घेऊन जात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड नेहमीच अरेरावीच्या वातावरणात राहत असतात
जितेंद्र आव्हाड यांना अटक ठोस पुराव्यांच्या आधारे झाली आहे, कुणालाही अटक होते ती नियमांच्या बाहेर होत नाही. जिथं घटना झाली तिथं सीसीटीटीव्ही होते, त्यात काही आढळल्यामुळेच पोलिसांनी कारवाई केली असावी. जितेंद्र आव्हाड नेहमीच अरेरावीच्या वातावरणात राहत असतात, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.