धोका वाढला : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले असून मृत्यूचीही संख्या हळूहळू वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धोका वाढला आहे. दरम्यान, आरोग्य विभाग सतर्क झाला असून कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्याचा सध्या कोरोनाचा पॉझिटीव्ह रेट हा 5.71 टक्के इतका खाली आला आहे. मात्र, कोरोनाबाधित मृत्यूची संख्या हि वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या 12 तासात 35 रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी 2 रूग्ण बाधित आढळून आलेत. तर सध्या 67 रुग्ण कोनोबाधित आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे केवळ 13 रूग्ण उपचार घेत आहेत. तर आज 37 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. आज कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या हि ४ इतकी झाली आहे.

कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा Click

सातारा जिल्ह्यात कोणतीही कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 99 टक्के नागरिकांनी पहिला, 80 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे अद्यापि लसीकरणापासून 20 ते 22 टक्के नागरिक दूर आहेत. परंतु लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.