टेन्शन वाढलं : सातारा जिल्ह्यात काेराेनामुळे आणखी एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात अध्या कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तसेच कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आज (शुक्रवार) दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण 90 बाधित रुग्ण आहेत.

दरम्यान गेल्या चोवीस तासात उपचारा दरम्यान साताऱ्यात एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्ह्याच्‍या विविध भागांत कोरोना आणि सिझनल इन्‍फ्‍यूएन्‍झा आजारांचा प्रसार होऊ लागला आहे. वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्‍या लक्षात घेत जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले आहे.

यापूर्वी कोरोनामुळे झालेत दोघांचे मृत्यू पहा Click

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, कोरोनाबाधितांच्‍या वाढणाऱ्या संख्‍येमुळे जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बरोबरच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँकांमधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करण्‍याचे आवाहन करण्यात आले आहे.