H3N2 चा धोका वाढला! राज्यात एका रुग्णाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना मधून आता कुठे तरी आपण सुटलो असा विचर करत असतानाच देशात H3N2 या नव्या विषाणूचे संकट निर्माण झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्रात H3N2 ची लागण झालेल्या एका तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. H3N2 बाधित एका 23 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे.

सदर तरुण हा मूळचा औरंगाबाद येथील असून तो अहमदनगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. मागील आठवड्यात तो कोकणात फिरायला गेला होता. त्यानंतरच तो आजारी पडला होता. त्याला ताप, खोकला आणि सर्दी अशी काही लक्षणे आढळून आली होती. सर्वप्रथम त्याची कोरोना चाचणी केली त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याची H3N2 टेस्ट केली असता त्यामध्येही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

त्याच्या मृत्यूनंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. या घटनेने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. देशात आत्तापर्यन्त या विषाणूमुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु आता या विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव केल्यामुळे पुन्हा एकदा संकटाचे ढग डोकयावर दिसत आहेत.