OnePlus Ace 3 Pro : 24GB RAM सह लाँच झाला OnePlus Ace 3 Pro; किंमत किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड वनप्लसने बाजारात नवीन मोबाईल लाँच केला आहे. OnePlus Ace 3 Pro असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 24GB RAM, 6100mAh बॅटरी यांसारखी अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत. सध्या कंपनीने चीनच्या मार्केटमध्ये हा मोबाईल आणला असून येत्या काळात तो भारतातही येऊ शकतो. आज आपण वनप्लसच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

डिस्प्ले –

OnePlus Ace 3 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2780×1264 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 4500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. OnePlus Ace 3 Pro मध्ये Adreno 750 GPU सह Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ColorOS 14.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. वनप्लसचा हा मोबाईल IP65 रेटिंगसह येतो. म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही कोणताही धोका नाही. याशिवाय सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Ace 3 Pro च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा बसवण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी साठी स्मार्टफोन मध्ये Dual SIM, 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Beidou, GPS, GLONASS: G1 आणि Type C पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती – OnePlus Ace 3 Pro

OnePlus Ace 3 Pro च्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,199 युआन (अंदाजे 36,730 रुपये), 16GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3499 युआन (अंदाजे 40,170 रुपये), 16GB + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1629 युआन म्हणजेच 43,610 रुपये आहे. 24GB + 1TB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 4399 युआन (अंदाजे 50,500 रुपये), 16GB + 512GB सिरेमिक स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3999 युआन (अंदाजे रुपये 45,905 रुपये आहे. हा स्मार्टफोन ३ जुलै पासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा मोबाईल टायटॅनियम मिरर सिल्व्हर, ग्रीन फील्ड ब्लू आणि सुपरकार पोर्सिलेन कलेक्शन या तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल.