OnePlus Ace 3V : 16GB रॅम सह OnePlus ने लाँच केला जबरदस्त मोबाईल; पहा किंमत किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OnePlus ने Ace 3V स्मार्टफोन लाँच केला आहे. स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 SoC प्रोसेसरसह लौंच होणारा हा पहिलाच मोबाईल आहे. हा मोबाईल म्हणजे OnePlus Ace 2V चे पुढचं व्हर्जन म्हणता येईल, परंतु यामध्ये अनेक अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. 50 मेगापिक्सल कॅमेरा, 5,500mAh बॅटरी मिळतेय. आज आपण या मोबाईलचे स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊया….

OnePlus Ace 3V मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2150 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 चिपसेटसह लाँच करण्यात आला असून Android 14 वर आधारित ColorOS 14ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो . कंपनीने या मोबाईल मध्ये 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिले आहे.

कॅमेरा – OnePlus Ace 3V

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OnePlus Ace 3V मध्ये OIS सह 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 प्राथमिक कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोन मध्ये 5,500mAh बॅटरीदेण्यात आली असून हि बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलवर तीन वर्षाची ओएस अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी पॅच देण्यात येत आहेत.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत CNY 1,999 म्हणजेच भारतीय चलनांनुसार 23,000 रुपये आहे. तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत CNY 2,299 (26,500 रुपये) आणि 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत CNY 2,599 (अंदाजे 30,000 रुपये) इतकी आहे. सध्या हा मोबाईल फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आला असून हा Magic Purple Silver आणि Titanium Air Grey या २ रंगात ग्राहक खरेदी करू शकतात.