हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OnePlus ने भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus Nord CE4 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 8GB रॅमसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. हा मोबाईल म्हणजे OnePlus Nord CE3 चे अपडेटेड व्हर्जनच म्हणावे लागेल. येत्या ४ एप्रिल रोजी हा मोबाईल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात.,…
6.74 इंचाचा डिस्प्ले –
OnePlus Nord CE4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HDR सपोर्टसह येत असून त्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89.3% आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेट बसवली असून हा मोबाईल Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे. तसेच आणखी 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट सिस्टीम सुद्धा यामध्ये मिळते.
कॅमेरा – OnePlus Nord CE4
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या मोबाईलच्या पाठीमागील बाजूसड्युअल कॅमेरा सेटअप आहे, त्यातील पहिला कॅमेरा 50MP आणि दुसरा कॅमेरा 8MP सेन्सरसह येतो. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी यात 5,500mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, OnePlus Nord CE4 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 24,999 रुपये आहे तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन डार्क क्रोम आणि सेलेडॉन मार्बल कलर ऑप्शनमध्ये बाजारात आणला असून येत्या ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल.