OnePlus Open Apex Edition : 16GB RAM सह OnePlus ने लाँच केला फोल्डिंग मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी OnePlus ने भारतीय बाजारात फोल्डिंग मोबाईल लाँच केला आहे. OnePlus Open Apex Edition असं या नव्या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 16GB RAM सह अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. दिसायला सुद्धा हा मोबाईल अतिशय आकर्षक असून तरुणाईला उभा स्मार्टफोनची चांगलीच भुरळ पडेल हे नक्की… आज आपण या मोबाईलचा कॅमेरा, प्रोसेसर, डिस्प्ले, बॅटरी याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

7.82-इंचाचा डिस्प्ले –

OnePlus Open Apex Edition मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.82-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर कव्हरला सुद्धा 120Hz रिफ्रेश रेटसह 6.31 इंचाचा डिस्प्ले मिळतोय. हे दोन्ही डिस्प्ले 2800 Nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतात. मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर बसवण्यात आला असून वनप्लसचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Oxygen OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. त्यानुसार स्मार्टफोन मध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा – OnePlus Open Apex Edition

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OnePlus Open Apex Edition मध्ये पाठीमागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा, 64MP टेलिफोटो लेन्स आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेराचा समावेश आहे, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 20MP आणि 32MP असे २ फ्रंट कॅमेरे उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईलमध्ये 4805mAh बॅटरी वापरली गेली आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती ?

OnePlus Open Apex Edition हा स्मार्टफोन 16GB RAM आणि 1TB स्टोरेज या फक्त एकाच स्टोरेज व्हॅरियेण्ट मध्ये येतो. या व्हेरिएंटची किंमत 1,49,999 रुपये आहे. 10 ऑगस्टपासून या मोबाईलची विक्री सुरु होईल. ग्राहक वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर, ग्राहकांना मायक्रोसॉफ्ट 365 पर्सनल चे ३ महिने मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय कंपनी Jio पोस्टपेड प्लॅनसह 15 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे.