Onion Auction | लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू; दर किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील आठ दिवसापासूनच माथाडी मंडळ यांच्यातील वाद सुरू असल्यामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झालेले होते. परंतु आज अखेर लासलगाव बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरू झालेला आहे. या स्थानिक बाजारात समितीतील व्यापारी यांनी या लिलावात भाग घेतला नाही, मात्र नवीन परवानेधारक तसेच विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी यांनी या लिलावात सहभाग घेऊन कांद्याचे लिलाव (Onion Auction) आधी सारखे सुरू केलेले आहेत.

या लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसापासून हमाली व्यापारी प्रश्र्नी लिलाव प्रक्रिया बंद केली होती. या लेव्ही प्रश्न व्यापारी व माथाडी मंडळी यांच्यातील सुरू असलेल्या मोठ्या वादामुळे कांद्याचे सगळे लिलाव (Onion Auction) ठप्प झालेले होते. परंतु आज हे लिलाव सुरू झालेले आहे.

उन्हाळी कांद्याला किती मिळाला भाव? | Onion Auction

आठवडा भरानंतर पुन्हा एकदा लासलगाव बाजार समितीचे लिलाव सुरू झाले असले, तरी या स्थानिक बाजारात समितीतील व्यापाऱ्यांनी यात सहभाग घेतलेला नाही. उन्हाळी कांद्याला सरासरी 1500 रुपये भाव या बाजार समितीत मिळालेला आहे. तर जास्तीत जास्त 2900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळालेला आहे.

शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान

या प्रश्नांवरून माथाडी मंडळ आणि व्यापारी यांच्यात सुरू झालेल्या या वादामुळ नाशिक जिल्ह्यात लासलगाव सह 15 बाजार समित्यांमध्ये कांदा शेतमालाचा लिलाव प्रक्रिया आठ दिवसापासून बंद होती. परंतु त्यांच्यातील या अंतर्गत वादामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागलेले होते. आता यात सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी माथाडी मंडळ व आणि व्यापार यांच्यातील प्रश्नांसंदर्भात आतापर्यंत दोन ते तीन बैठक झाल्या. मात्र प्रत्येकजण आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने यावर कोणताही तोडगा काढता आलेला नाही. आणि त्यामुळेच गेल्या आठवड्यावर बाजार समित्या बंदच राहिल्या होत्या. जिल्हा निबंधकांनी व्यापारी लिलावात सहभाग होत नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करा असे आदेश काल लासलगाव येथील संचालक मंडळांनी बैठकीत दिला. त्यानंतर लालसगाव बाजार समितीतील कांदा लिलाव पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळत असला, तरीही त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालेले आहे.