Onion Export | सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली पण निर्यात शुल्क केले लागू, शेतकऱ्यांना होणार तोटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Export | आपल्या भारतामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. आणि या कांद्याची निर्यात देखील होत असते. या कांद्याच्या निर्यातीबाबत आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता सरकारने कांद्याचे निर्यातीवरील बंदी हटवली आहे. सरकारने जरी निर्यातवरील बंदी हटवली असेल, तरी देखील दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मॅट्रिक टन किमान निर्यात शुल्क देखील सरकारने लागू केलेला आहे. सरकारने हे निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याचे किमती (Onion Export ) वाढणार नाही. याची दक्षता सरकारने घेतले देखील बोलले जात आहे.

7 डिसेंबर 2024 ला केली होती निर्यातबंदी | Onion Export

देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. आणि यामध्ये सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. कांद्याची (Onion Export ) निर्यातीवरील बंदी हटवलेली आहे. परंतु 550 डॉलर मॅट्रिक टन किमान निर्यात शुल्क देखील सरकारने ठेवलेले आहे. परंतु हे निर्यात खूप जास्त असल्याने निर्यात करणे शक्य होणार नाही. सरकारने निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय हा 7 डिसेंबर 2023 रोजी घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला होता. यानंतर एनसीईएलच्या माध्यमातून काही देशांमध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु आता सरकारने ही निर्यात बंदी हटवली आहे.

कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी निर्यात शुल्क लागू

सरकारने निर्यातीवरील बंधने जरी हटवली असली, तरी निर्यातीवरील शुल्क आकारले आहे. कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु आकारल्याने शेतकऱ्यांना याचा काही फायदा होणार नाही. मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्देशित करावे करण्यात आले होते. परंतु आता सरकारने पुन्हा एकदा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

6 देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी

कांद्याची निर्यात बंदी हटवली असताना सरकारने शेजारील सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. यामध्ये सुमारे एक लाख टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती. यामध्ये बांगलादेश संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहारी, श्रीलंका या सहा देशांचा समावेश आहे. म्हणजे सहा देशांना मिळून 99150 टन कांदा निर्यात केला जाणार आहे.