हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Onion Export नुकतेच केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे आता कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ती म्हणजे आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे. 99, 150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता एकूण सहा देशांमध्ये हा कांदा निर्यात केला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या परवानगीनुसार आता बांगलादेश युएई, भूतान, बहरिन, मोरेसिस आणि श्रीलंका या देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा एक मोठा जिल्हा मिळालेला आहे
या आधी महाराष्ट्रातील लाल कांदा निर्यातीवर बंदी होती. ती बंदी असताना देखील गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची निर्यात सरकारने चालू ठेवली होती. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे केंद्र सरकारने आज सगळा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. सध्या राष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढलेले असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा कांदा निर्यात सुलभ होण्यासाठी नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड ही एजन्सी नियुक्त केलेली आहे.
त्याचबरोबर एनसीईएल स्पर्धात्मक किमतीमध्ये ई प्लॅटफॉर्म द्वारे देशांतर्गत उत्पादकांकडून कांद्याची खरेदी देखील करण्यात येणार आहे. यामध्ये 100 टक्के आगाऊ पेमेंट देऊन कांद्याचा पुरवठा देशांच्या नामांकित एजन्सी पुरवठा केला जाणार आहे. 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला देखील परवानगी दिलेली होती.