Onion Prices | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण आता कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. कांद्याची मागणी वाढल्यामुळे त्यांच्या भावात देखील वाढ झालेली आहे. याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. परंतु ग्राहकांना मात्र याचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे.
कांद्याच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ | Onion Prices
सध्या कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत होते. परंतु आता कांद्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गेल्या 15 दिवसात घाऊक बाजारात कांद्याच्या भावात 50 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरात 12 रुपयांनी वाढ झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. परंतु दुसरीकडे सामान्य नागरिकांना मात्र चांगलाच अधिक फटका बसणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 30 ते 50 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कारण कांद्याचा पुरवठा कमी होत आहे आणि दुसरीकडे बकरी ईद पूर्वी कांद्याची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे व्यापारी देखील कांद्याची साठे भाजी करत आहेत.
महाराष्ट्रातही कांद्याच्या दरात वाढ
महाराष्ट्रात देखील कांद्याचे दारात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक घाऊक बाजारामध्ये कांद्याचा भाव हा 30 रुपयांच्या पुढे गेलेला आहे. जून पासून बाजारात येणारा कांदा हा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या साठ्यातून येणार आहे. 2023- 24 च्या रब्बी पिकाच्या संभाव्य घसरणीमुळे वाढ होण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी आता त्यांचा साठा उतरवत आहे.
कांद्याच्या दरात वाढ होण्याची कारणे
कांद्याच्या 40% निर्यात शुल्कासह कांद्याची निर्यातही कमी होत आहे. त्यात 17 जून रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्त कांद्याला देशांतर्गत चांगली मागणी आहे. असा व्यापारांचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. महाराष्ट्रातील कांद्याचा दक्षिणेकडून राज्यातून जोरदार मागणी आहे.