अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा : छ. उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तर, खासदार उदयनराजे भोसले यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच, प्रतापगडावरील अफझलखान यांची कबर पर्यटकांसाठी खुली करा, अशी मागणीही शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

प्रतापगडावरील अफजल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा. भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळला पाहिजे. मुस्लिम समाजाने गैरसमज करून घेऊ नये. या गोष्टीला राजकीय स्वरूप देणं उचित नाही.अतिक्रमण काढून जे केलं ते योग्यच केलं असल्याचे सांगत उदयनराजे भोसले यांनी सरकारला कबर खुली करण्याचे आवाहन केलं आहे.

तर, छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंड येथून परत आणण्याचा मानस सरकारचा असल्याचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल सांगितले. यावर इंग्लंड येथील जगदंब तलवार ही ऐतिहासिक ठेवा असून ब्रिटिश सरकारने मोठं मन दाखवून ती परत केली पाहिजे, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळीच उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट घेतली. दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली असून चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. परंतु, ही भेट राजकीय नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.