मणिपाल हॉस्पिटल बाणेर तर्फे सातार्‍यात ओपीडीजची सुरुवात; ‘या’ आजाराच्या रुग्णांना होणार लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आपल्या आरोग्य सेवांमध्ये वाढ करत पुण्यातील बाणेर येथे असलेल्या मणिपाल हॉस्पिटलने डॉ. थोरात्स पॅथोलॉजी लॅबोरेटरी, साताराच्या सहकार्याने सातार्‍या मध्ये २ मे २०२३ पासून ओपीडीजची सेवा सुरु करत असल्याची घोषणा केली. आता या भागातील रुग्णांना २ मे पासून दर मंगळवार आणि शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान मणिपाल हॉस्पिटल्स, बाणेरच्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी/सल्लामसलत प्राप्त होणार आहेत, विशेष करुन कॅन्सर, कार्डिॲक, न्युरो, गॅस्ट्रो, रिनल, ऑर्थोपेडिक्स आणि जॉईंट रिप्लेसमेंट सारख्या आरोग्य समस्या असलेल्या रुग्णांना विशेष लाभ होणार आहे.

मानवी शरीरातील अधिकतर आजारांचे जर लवकर निदान झाले तर त्यावर अधिक चांगले उपचार होत असतात. काही कॅन्सर आणि हृदयरोगांसारख्या आजारात लवकर निदान झाले तरच मृत्यू टाळता येऊ शकतो. जीवनशैलीतून ‍निर्माण होणार्‍या आजारांची वाढती संख्या पाहता सर्व वयोगटातील आणि लिंगाच्या लोकांनी वेगवेगळी लक्षणे समजून घेऊन आजाराचा धोकाही समजून घेणे आवश्यक आहे. हे करण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वैद्यकीय तज्ञांकडून सल्ला घेऊन त्यांच्याशी लवकरात लवकर लक्षणांवर चर्चा करणे आवश्यक आहे.

नियमित तपासणी चे महत्त्व सांगतांना मणिपाल हॉस्पिटल, बाणेर-पुणे येथील हॉस्पिटल संचालिका डॉ. विजू राजन म्‍हणाल्‍या “या ओपीडीच्या माध्यमातून आम्ही लोकांना नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगू इच्छित आहोत. कॅन्सर आणि हृदयरोगांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या प्रथम कोणतीही लक्षणे न दिसता सुरु होता आणि नंतर ते आजार विकसित होतात. अधिकतर केसेस मध्ये लोक साधारण लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि हीच लक्षणे पुढे गंभीर आजार बनतात. आजघडीला तरुण मुलांना सुध्दा हृदयरोग किंवा न्युरोलॉजिकल समस्या या बदलत्या जीवनशैली मुळे होतांना दिसतात.

यावेळी बोलताना डॉ. थोरात यांनी सांगितले, डॉ. थोरास पॅथोलॉजी लॅब आणि पुण्यातील बाणेर येथील माणिपाल हॉस्पिटल यांच्या संयुक्त तपासणी मला उपक्रमाची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मणिपाल हॉस्पिटल्स हे आरोग्य क्षेत्रातील उच्च कार्यक्षमतेची सेवा आणि अत्याधुनिक क्षमतांसाठी एक प्रतिथयश असे नाव आहे. सातार्‍यातील मणिपाल क्लिनिक्स मुळे सातार्‍यातील रहिवाश्यांसाठी उत्तम उपक्रम सुरु करण्यात आला असून यामुळे विविध विशेषतांमधील तज्ञ एकत्र येऊन सातार्‍यातील आणि आसपासच्या नागरिकांना सर्वोत्कृष्ट उपचार उपलब्ध होतील.”

ओपीडी विषयी माहिती :

पत्ता- मणिपाल क्लनिक्स, ४९७, सुर्या कॉम्प्लेक्स, सेंट पॉल स्कूल समोर, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, सदरबाजार, सातारा- ४१५ ००१.
दिनांक – प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी
वेळ- सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत