हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor Inside Story ) असं नाव देण्यात आल असून पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताने बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बारनाला, सरजाल आणि महमूना याठिकाणी हल्ले केले… या हल्ल्यासाठी 7 मे 2025 रोजी रात्री 12:37 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहेत. या कामगिरी बद्दल भारतीय सैन्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. मात्र ऑपरेशन सिंदूरचा मास्टरमाईंड कोण होता? ऑपरेशन सिंदूरला ग्रीन सिग्नल कोणी दिला? त्यामागची इन्साईड स्टोरी काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात…
ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी अजित डोभाल यांच्या खाद्यावर- Operation Sindoor Inside Story
ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांच्या खाद्यावर होती. अजित डोवाल यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण ऑपरेशन सिंदूरची कमान सांभाळली. या कारवाईसाठी एक अतिशय खास टीम तयार करण्यात आली होती आणि एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला होता, जो पूर्णपणे एनएसए अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली होता. ऑपरेशन पूर्वी पहिल्या टप्प्यात पाकिस्तान अंतर्गत सुरू असलेल्या लष्करी आणि दहशतवादी यांच्या हलचालींची माहिती जमा करण्यात आली. इंटेलिजन्स इनपूट जमा केल्यानंतर दहशतवादी लपलेल्या ठिकाणी एकामागून एक हल्ले करण्यात आले.भारताने या सर्व ठिकाणांवर बारीक नजर ठेवली होती आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. जिथे जिथे दहशतवादी लपलेले आहेत. त्यांची प्रशिक्षण केंद्र आहेत. यसेच ज्याठिकाणी दहशतवादी तयारी करण्याची फॅक्टरी आहे, त्यावर धडाधड मिसाईल हल्ले करण्यात आले.
हे पण वाचा : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील ‘ही’ विमानतळे बंद; लगेच चेक करा
दहशतवाद्यांचा खात्मा करणारा जबरदस्त प्लॅन तयार होताच (Operation Sindoor Inside Story ) अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर फक्त दहशतवाद्यांनाच टार्गेट करण्याचे ठरले. यानंतर अजित डोभाल यांनी त्यांच्या खास पथकासोबत पुन्हा एकदा बैठक घेतली. हल्ल्याच्या अंतिम योजनेसाठी अजित डोभाल हे पुन्हा पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान मोदी यांनी हल्ला करण्यास मंजूरी दिली. हल्ल्याची माहिती खूप कमी लोकांना देण्यात आली आणि एनएसए अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. ही कंट्रोल रूम अजित डोभाल यांच्या देखरेखीत हल्ल्याची सर्व योजना राबवण्यात आली. इशारा मिळताच भारतीय फाईटर जेट्सने ऑपरेशन सिंदूरचा निर्णायक वार केला. रात्री 12:37 वाजता भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाण्यांवर मिसाईल डागले. पाहता पाहता दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली.
भारताने कोणकोणत्या भागात एअर स्ट्राईक केला?
१) बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2) मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3) सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4) गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5) बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6) कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7) बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8) सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9) महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर




