Operation Sindoor PC : पाकिस्तानमधून भारतात आणखी हल्ले होऊ शकतात; गुप्त माहिती समोर

Operation Sindoor PC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत रात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल असून पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताने बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बारनाला, सरजाल आणि महमूना याठिकाणी हल्ले केले..या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत (Operation Sindoor PC) संपूर्ण माहिती देशवासियांना दिली. यावेळी पाकिस्तानमधून भारतात आणखी हल्ले होऊ शकतात अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.

पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला- Operation Sindoor PC

पत्रकार परिषदेत विक्रम मिसरी म्हणाले, पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला क्रूर होता, दहशतवाद्यांनी अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटना आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. आमच्या गुप्तचर यंत्रणेने हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा केली आहे. या हल्ल्याचा पाकिस्तानशी थेट संबंध आहे. किंबहुना पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानने अतिरेक्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट आरोप करण्यातचं पाकिस्तान मग्न होता. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती इनपूटद्वारे आम्हाला मिळाली होती, म्हणून, ते आधीच थांबवण्याची आणि रोखण्याची गरज होती…. त्यामुळे आज मध्यरात्री भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची होती. भारतात अतिरेकी पाठवण्यावर रोख लागण्यासाठी ही कारवाई होती अशी माहिती सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. (Operation Sindoor PC)

दरम्यान, विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. त्यानुसार ९ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. गेल्या तीन दशकांमध्ये, पाकिस्तानने पद्धतशीरपणे दहशतवादी पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. हे भरती आणि प्रशिक्षण केंद्रे, प्रेरण आणि रीफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षण क्षेत्रे आणि कार्यकर्त्यांसाठी लाँचपॅडचे एक गुंतागुंतीचं जाळे आहे