OPPO A3 5G : Oppo ने लाँच केला बजेट स्मार्टफोन; 50MP कॅमेरासह मिळतात ‘हे’ फीचर्स

OPPO A3 5G launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ती प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने OPPO A3 5G नावाचा नवा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. 6GB रॅम असलेल्या या मोबाईलची किंमत कंपनीने 15,999 रुपये ठेवली आहे. म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा बजेट किमतीत हा स्मार्टफोन बाजारात आला आहे. यामध्ये 50MP कॅमेरा, 5,100mAh बॅटरी सारखे भन्नाट फिचर देण्यात आले आहेत. आज आपण ओप्पोच्या या नव्या हॅण्डसेटचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात….

डिस्प्ले-

OPPO A3 5G मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा LCD HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1604 × 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 1000 nits पीक ब्राइटनेस सपोर्ट मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 Soc चिपसेट बसवण्यात आली आहे. मोबाईल मध्ये 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. ओप्पोचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Color OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा – OPPO A3 5G

प्रत्येकवेळी मोबाईल खरेदी करत असताना आपण त्याची कॅमेरा क्वालिटी बघत असतो. OPPO A3 5G मध्ये पाठीमागील बाजूल 50MP चा मुख्य कॅमेरा आणि LED फ्लॅशसह 2MP पोर्ट्रेट कॅमेरा बसवण्यात आला आहे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,100mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्स बाबत सांगायचं झालयास या मोबाईल मध्ये साइड-माउंट, फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ल्टिपल लिक्विड रेझिस्टन्स, SGS ड्रॉप-रेझिस्टन्स सर्टिफिकेशन, SGS मिलिटरी स्टँडर्ड सर्टिफिकेशन, ड्युअल-सिम, 5जी, वाय-फाय, यूएसबी टाइप सी पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

Oppo A3 5G च्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, 6GB+128GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये आहे. Oppo India e-store वर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असून बँक ऑफ बडोदा आणि SBI बँक कार्डवर ग्राहकांना 10% इन्स्टंट सूट मिळतेय. ओप्पोचा हा मोबाईल लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे.