Oppo A3 मोबाईल 12GB रॅम, 50MP कॅमेरासह लाँच; किंमत किती पहा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo ने चिनी बाजारात आपला नवा स्मार्टफोन Oppo A3 लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये 12GB रॅम, 50 MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. येत्या काही महिन्यात ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सुद्धा लाँच होऊ शकतो. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

डिस्प्ले –

OPPO A3 मध्ये 120Hz चा रीफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. याशिवाय मोबाईलला 1200 nits पीक ब्राईटनेस मिळत असून ओप्पोचा हा मोबाईल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i च्या प्रोटेक्शन सह येतो. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा मोबाईल Android 14 वर काम करतो.

कॅमेरा – Oppo A3

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OPPO A3 मध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कैमरा आणि समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 45 वॅट सुपरVOCC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Oppo A3 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळतो.

किंमत किती?

मोबाईलच्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 1599 युआन (अंदाजे 18,365 रुपये) पासून सुरू होते. 12GB + 256GB मॉडेलची किंमत 1799 युआन (अंदाजे 20,660 रुपये) आहे. 12GB + 512GB मॉडेलची किंमत 2099 युआन (अंदाजे 24,110 रुपये) आहे. हा स्मार्टफोन काळा, पर्पल आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे.