Oppo A3 Pro : 12GB रॅमसह Oppo ने लाँच केला जबरदस्त मोबाईल; मिळतात भन्नाट फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Oppo A3 Pro : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Oppo ने जागतिक बाजारात Oppo A3 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 12GB रॅम, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा यांसारखी जबरदस्त फीचर्स या मोबाईल मध्ये देण्यात आली आहेत. ओप्पोच्या या मोबाईल मध्ये स्क्रॅच आणि ड्रॉप प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. म्हणजे हा फोन उंचावरून पडल्यावर देखील त्याला काहीही होणार नाही. आज आपण या मोबाईलचे फुल्ल स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Oppo A3 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा कर्व्ह OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्युशनचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या मोबाइलमध्ये Dimensity 7050 चिपसेट बसवली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित कलर ओएसवर चालतो. Oppo A3 Pro मध्ये खालच्या बाजूला टाइप-सी पोर्ट, मायक्रोफोन, सिम कार्ड ट्रे आणि स्पीकर ग्रिल देण्यात आले आहेत.

कॅमेरा – Oppo A3 Pro

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Oppo A3 Pro मध्येपाठीमागील बाजूला 64 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 67W चार्जिंगला सपोर्ट करते. ओप्पो चा हा मोबाईल IP69 रेटिंगसह येतो. म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून त्याला कोणताही धोका नाही.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न मोबाईलच्या किमतीबद्दल, तर Oppo A3 Pro च्या ८ GB रॅम मॉडेलची किंमत १९९९ युआन म्हणजे भारतीय चलनानुसार २३,५०० रुपयांच्या आसपास आहे. तर १२GB +२५६ GB स्टोरेज मॉडेलची किंमत २१९९ युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार २५,९९९ रुपये, आणि १२ GB +५१२ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४९९ युआन म्हणजेच २९,००० रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल Azure, Pink आणि Blue कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.