Oppo K12 : Oppo ने 12GB रॅम, 50MP कॅमेरासह लाँच केला नवा मोबाईल; किंमत किती पहा??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Oppo ने जागतिक बाजारात आपला नवा मोबाईल लाँच केला आहे. Oppo K12 असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये कंपनीने 12GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 100W चार्जिंगसह आणेल भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. खास बाब म्हणजे ओप्पोचा हा मोबाईल OnePlus Nord CE 4 5G सारखाच हुबेहूब दिसतो. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले-

Oppo K12 मध्ये 120 हर्ट्झचा रिफ्रेश सह 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला HD + रिझोल्यूशन मिळते. तसेच यामध्ये 1100 निट्सची पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. ज्यामुळे कितीही ऊन असले तरी मोबाईल हॅन्डल करणे यूजर्स साठी सोप्प जाणार आहे. तसेच या मोबाईल मध्ये कुलिंग सिस्टीम देखील देण्यात आली आहे, जेणेकरून कितीही गेम खेळत बसला तरी मोबाईल जास्त गरम होण्याची शक्यता नाही. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर बसवला असून Oppo चा हा नवा मोबाईल Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. तुम्हाला या मोबाईलमध्ये 12GB रॅम +512GB चे दमदार स्टोरेज मिळतेय.

कॅमेरा – Oppo K12

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Oppo K12 मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 5500 mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 100W चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Oppo K12 च्या 8GB + 256GB व्हेरिएन्टची किंमत 1,899 युआन (भारतीय चलनानुसार अंदाजे 21,831 रुपये) आहे. तसेच 12GB+256GB मॉडेलची किंमत 2,099 युआन (अंदाजे 24,621 रुपये) आणि टॉप व्हेरिएंट असलेल्या 12GB+512GB स्टोरेज मोबाईलची किंमत 2,499 युआन ( 28,729 रुपये ) आहे. हा स्मार्टफोन क्लियर स्काय आणि स्टाररी नाईट रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. भारतात हा मोबाईल कधी येईल हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही.