निवडणुकीत हणबरवाडी- धनगरवाडी योजनेच्या श्रेयवादासाठी विरोधक येतात : आ. बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी 
कराड उत्तर मतदार संघात काही मंडळी या निवडणूका आल्या की श्रेयवादासाठी पुढे येतात. सन 2009, 2014 आणि 2019 अगोदर याच गोष्टी पहायला मिळाल्या. परंतु ही योजना पूर्ण व्हावी, यासाठी पाठपुरावा केला नाही. या योजनेसाठी पूर्ण पाठपुरावा मी स्वतः केला आहे. ज्या भागातील लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे, त्यांना माहिती आहे. यांचा कोणी पाठपुरावा केला. केवळ निवडणुका आल्या की काही लोकांना राजकीयदृष्ट्या एकत्र करतात, आणि श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न करतात असा आरोप माजी सहकारमंत्री व कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांनी केला.

रिसवड (ता.कराड) येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, सौ. शालन माळी, माजी उपसभापती सुहास बोराटे, माजी सदस्य भाऊसाहेब चव्हाण, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, साळुंखे राजेश पाटील वाठारकर, संचालक सागर पाटील, सौ संगीता साळुंखे, माजी सभापती सौ. शालन माळी, सौ. शारदा पाटील, लहुराज जाधव, पांडुरंग चव्हाण, दाजी पवार, काकासो गायकवाड, लालासाहेब पाटील, तानाजी जाधव, डी. बी जाधव, रामदास पवार, माणिकराव पाटील, शंकर पाटील, संभाजी पिसाळ, संजय पिसाळ, आप्पासाहेब माने, अरविंद जाधव, पैलवान संतोष वेताळ, नेताजी चव्हाण आदी उपस्थित होते.
काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारने प्रयत्न केले
रिसवड दुष्काळ पट्यातील गाव आहे. परंतु धनगरवाडी- हणबरवाडी या योजनेमुळे हे गाव बागायत होणार आहे. या भागातील प्रत्येक गाव हा बागायत झाला पाहिजे, यासाठी 1999 सालापासून काॅंग्रेस- राष्ट्रवादी सरकारने प्रयत्न केले. त्याचे मूर्त स्वरूप आज दिसायला लागले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याच्या जीवनात अर्थिक परिवर्तन घडणार आहे, असे आ. बाळासाहेब पाटील म्हणाले.