हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ, गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये विशेष करून मेंदूला चालना देणारे ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो पहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून त्या फोटो हेलिकॉप्टर आहे. ते हेलिकॉप्टर तुम्हाला शोधून दाखवायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त एक टक्के लोकांनाच हे कोडे सोडवता आले असून तुमची नजर जर तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करा.
जर तुमची नजर अधिक तीक्ष्ण असेल आणि खूप विचार करत असाल तरच तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला खडकात लपलेलं हेलीकॉप्टर सापडेल. जर तुम्ही ५ सेकंदात हेलिकॉप्टर शोधू शकत असाल तर तुम्ही हुशार आहात हे सिद्ध होईल. तसे पाहिले तर या फोटोत असलेलं हेलिकॉप्टर शोधणे कठीणच आहे.
मात्र, ज्या कलाकाराने हे चित्र रेखाटले आहे तर ते चित्रात अशाप्रकारे लपवले आहे की ते सहज शोधता येत नाही. पण जर तुम्ही हे चित्र नीट पाहिल्यास तुम्हाला या चित्रात हेलिकॉप्टर सहज दिसेल.
‘या’ ठिकाणी आहे हेलिकॉप्टर
खूप काही प्रयत्न करू देखील तुम्ही हेलिकॉप्टर शोधू शकला नसाल तर आता आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की, हेलिकॉप्टर कुठे आहे. हेलिकॉप्टर खडकात लपले आहे, त्यामुळे ते शोधणे कठीण झाले आहे. चित्र काळजीपूर्वक पहा, चित्रात हेलिकॉप्टर कुठेही उपस्थित असू शकते. हेलिकॉप्टर चित्राच्या मध्यभागी थोडेसे वर उडत आहे.