ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे सैनिक मित्रांचा सन्मान आणि अवयवदान जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे नाट्यमहोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ व २ सप्टेंबर रोजी बालगंधर्व येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक , आयोजक डॉ राजेंद्र खेडेकर यांनी दिली.
खेडेेकर म्हणाले हा उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असून अवयवदान जनजागृती होण्यासाठी व सैनिक मित्रांचा यथोचित सन्मान करण्याकरता अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे आहे. सियाचीन येथे भारतीय सैनिकांसाठी ऑक्सिजन प्रकल्प साकारणारे सैनिक मित्र योगेश चिथडे आणि सुमेधा चिथडे यांच्याबरोबर डॉ परवेज ग्रँट, सदानंद सरदेशमुख , काश्मीर राज्यातील जिल्हाधिकारी डॉ सागर डोईफोड़े, डॉ स्वरूप सावनुर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. २ सप्टेंबर रोजी १२:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळयाच्या वेशभुषेत अवयवदानाची शपथ घेणार आहेत. तसेच केरळ आपत्तीग्रस्तांसाठी २५ हजारांचा निधी पुणे ब्लड बँकेच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल.
द्वितीय दिवसीय कार्यक्रमासाठी बाबासाहेब पुरंदरे , पालकमंत्री गिरीश बापट , पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, आमदार नीलम गोऱ्हे, श्रीकांत भारतीय आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ खेडेेकर यांनी दिली.

Leave a Comment