Thursday, February 2, 2023

अंबवडे येथील जंगली महाराज आश्रमातर्फे पंढरपूर कार्तिकी पायी दिंडीचे आयोजन

- Advertisement -

कोरेगाव | दरवर्षीप्रमाणे श्री विश्वात्मक ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रम अंबवडे संमत वाघोली यांचा पंढरपूर कार्तिकी यात्रे निमित्ताने पायी वारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने या पायी वारीचे प्रस्थान अंबवडे येथील श्री क्षेत्र जंगली महाराज आश्रम येथून बुधवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी होणार आहे. गेली 9 वर्षे परमपूज्य ब्रम्हानंद महाराज यांच्या शुभआशीर्वादाने व नेतृत्वाने या दिंडी सोहळ्याचे अगदी योग्य प्रकारे नियोजन करण्यात येते महाराष्ट्रातून भाविक भक्तगण या पायी सोहळ्यात सामील होत असतात.

या वर्षी पंढरपूर कार्तिकी यात्रे निमित्ताने अंबवडे येथील श्री विश्वात्मक ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रम येथे कोरेगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार महेशजी शिंदे व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदन दादा भोसले यांच्या शुभहस्ते रथाचे पूजन करून बुधवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानाला मोठ्या प्रमाणावर समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी एकादशी दिवशी दिंडी सोहळा पंढरपूर मध्ये दाखल होणार असून काल्याच्या कीर्तनाने सांगता होवून ५ नोव्हेंबरला परतीचा प्रवास सुरू होणार आहे अशी माहिती परमपूज्य ब्रम्हानंद महाराज श्री विश्वात्मक ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रम अंबवडे यांनी दिली.