पुणे प्रतिनिधी । विद्यार्थिनींमध्ये वाचन आणि संशोधन संस्कृती वृधींगत व्हावी यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हीराबेन नाणावटी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च फॉर वुमेन संस्थेमध्ये नुकतेच ‘बुकशेल्फ २०१९’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १८३ विद्यार्थिनींनी स्पर्धेत उपस्थिती नोंदवली होती. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी पोस्टर्स, मॉडेल्स, पुस्तक परिक्षण व पी.पी.टी. चे सादरीकरण केले.
विद्यार्थिनींमध्ये वाचन आणि संशोधन संस्कृती वृधींगत व्हावी आणि शैक्षणिक पुस्तकां व्यतिरिक्त इतर पुस्तकांचेही वाचन व्हावे, असा या कार्यक्रमाचा हेतू होता. सिक्स थिंकिंग हॅट्स, लाइफ इस नॉट वर्क; वर्क इस नॉट लाइफ, द पॉवर ऑफ यूर सबकॉनशिअस माइंड, द लीडर हाउ हॅड नो लिट्ल, लेडी यू आर द बॉस अशा विविध विषयांवरील पुस्तकांवर व्यवस्थापनाच्या नजरेतून विद्यार्थिनींनी सादरीकरण केले.
प्रश्नोत्तरांच्या सदरामध्ये विद्यार्थिनींची पुस्तक निवडी मागची भुमिका परिक्षकांनी जाणून घेतली. स्पर्धेच्या अखेरीस निकाल जाहीर करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते परितोषिकांचे वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून सरिता चितोडकर, सुवर्णरेखा जाधव आणि डॉ.मेधा खासगीवाले यांनी कामकाज बघितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक डॉ.जगदीश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल मंजुश्री नवले, श्रद्धा दरेकर, रिया वाघ आणि वैष्णवी भैरप्पा यांनी कार्यक्रमाचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडले.