Oscar 2024 Nominations : Oscar 2024 नामांकन यादी जाहीर!! ओपनहायमर, बार्बीसह या चित्रपटांनी मिळवले स्थान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Oscar 2024 Nominations | मंगळवारी सर्वोत्कष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर 2024 साठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा 96 वा ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळा 10 मार्च रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वीच भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ऑस्कर 2024ची नामांकने जाहीर झाली आहेत. या यादीत कोणकोणत्या चित्रपटाला स्थान मिळाले आहे जाणून घेऊयात.

सर्वोत्कृष्ट चित्रपट

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारात (Oscar 2024 Nominations) अमेरिकन ओपनहायमर, दि झोन बार्बी, ऑफ इंटरेस्ट फिक्शन, एनाटॉमी ऑफ अ फॉल, दि होल्डओव्हर्स, किलर्स ऑफ दि फ्लॉवरमून, माएस्ट्रो, पास्ट लाईव्ह्ज, पूअर थिंग्स, या चित्रपटांना स्थान मिळाले आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यादीत जस्टिन ट्राइट (द एनाटॉमी ऑफ ए फॉल), मार्टिन स्कोर्सेस (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून), ख्रिस्तोफर नोलन (ओपेनहाइमर), यॉर्गोस लँथिमोस (पूअर थिंग्स), जॉनथन ग्लेझर (दि झोन ऑफ इंटरेस्ट) यांना स्थान देण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता– Oscar 2024 Nominations

ऑस्कर 2024 साठी ब्रॅडली कूपर (माईस्ट्रो), कोलमन डोमिंगो (रस्टिन) , पॉल गियामट्टी (दि होल्डओव्हर्स), सिलियन मर्फी (ओपेनहायमर) जेफ्री राइट (अमेरिकन फिक्शन) या अभिनेत्यांना स्थान मिळाले आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-

तसेच, ऍनेट बेनिंग (न्याड), लिली ग्लॅडस्टोन (किलर्स ऑफ दि फ्लॉवर मून) , सँड्रा हलर (एनाटॉमी ऑफ अ फॉल), केरी मुलिगन (माईस्ट्रो) या अभिनेतींना स्थान मिळाले आहे.

येत्या 10 मार्च 2024 रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेमध्ये संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. भारतीय वेळेनुसार ही वेळ 5.30 ची असेल. त्यापूर्वी आज अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमध्ये नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे.