Osmanabad Railway Station : मोठी बातमी!! महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्टेशनचं नाव बदललं

Osmanabad Railway Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Osmanabad Railway Station। महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाने राज्यातील एका रेल्वे स्टेशनचं नाव बदललं आहे. हे रेल्वे स्टेशन म्हणजे उस्मानाबादचे रेल्वे स्टेशन…. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केलं आहे. आता रेल्वे विभागानेही उस्मानाबाद स्टेशनचं नाव बदलून धाराशिव रेल्वे स्टेशन केलं आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, स्थानकाचे नवीन नाव ‘धाराशिव’ आणि त्याचा नवीन कोड DRSV याला इंडियन रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन (IRCA) ने मान्यता दिली आहे. पूर्वी हे स्थानक UMD या कोडखाली उस्मानाबाद म्हणून ओळखले जात होते.

उस्मानाबाद रेल्वे स्थानक (Osmanabad Railway Station) मध्य रेल्वे (CR) झोनच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येते. यापूर्वी मागील काही वर्षात अनेक रेल्वे स्टेशनची नाव बदलली आहेत, त्यात आता उस्मानाबादची भर पडली आहे. खरं तर भारतात, रेल्वे मंत्रालय स्वतःहून स्थानकांमध्ये बदल करू शकत नाही किंवा नावे बदलू शकत नाही. त्यासाठी सर्वात आधी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागतो. राज्य सरकारने एखादे नाव मंजूर केल्यानंतर तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जातो. रेल्वे विभाग उर्वरित प्रक्रिया सुरू करते, जसे की नवीन स्टेशन कोड, तिकीट प्रणालीतील बदल, प्लॅटफॉर्म साइनेज …..

स्थानकाचे नाव तीन भाषांमध्ये लिहिले जाते – हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषा… यापूर्वी उस्मानाबाद म्हणून ओळखल्या स्टेशनचा स्टेशन कोड UMD होता, आता धाराशिव असं नामांतर झाल्यानंतर नवा स्टेशन कोड DRSV असा आहे.

नवीन नाव खालीलप्रमाणे सादर केले जाईल: Osmanabad Railway Station

मराठीत (देवनागरी लिपी): धाराशिव

हिंदीमध्ये (देवनागरी लिपी): धाराशिव

इंग्रजीमध्ये (रोमन लिपी): DHARASHIV

नाव बदलण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, मुंबई पीआरएस (प्रवासी आरक्षण प्रणाली) ३१ मे रोजी रात्री ११:४५ ते १ जून रोजी पहाटे १:३० वाजेपर्यंत तात्पुरती बंद राहील. या काळात, तांत्रिकदृष्ट्या अपडेट करून सिस्टममध्ये नाव बदल लागू केला जाईल.