अरे बापरे !!! हे काय, जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळ्या व्यक्ती; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. इथल्या एका माणसाला धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला कळले कि त्याच्या जुळ्या मुलांचा बाप तो एकटा नाही तर आणखीही दुसरा कोणीतरी आहे. या दोन मुलांच्या डीएनए अहवालात असे दिसून आले आहे की त्यांचे वडील हे वेगवेगळे आहेत. हा खुलासा झाल्यामुळे या व्यक्तीस हे देखील कळले की त्याची पत्नी आपली फसवणूक करीत आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, दहा लाखातून असे एखादे प्रकरण समोर येऊ शकते जथे जुळ्या मुलांचे वडील हे वेगवेगळ्या व्यक्ती असतात. चिनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाची डीएनए चाचणी करणे हा त्यांच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. डेंग याजुन नावाच्या या व्यक्तीला आपल्या पत्नीबद्दल आजिबात शंका नव्हती आणि ते दोघेही खूप आनंदी होते. डॉक्टरांच्या मते, कधीकधी महिन्याभरात स्त्रियांच्या शरीरात एका अंड्याऐवजी दोन अंडी देखील तयार होतात. या प्रकरणात दोन भिन्न पुरुषांच्या शुक्राणूंनी ती अंडी फलित केल्या.

बीजिंगच्या झोंगझेंग फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेंटरच्या मते, जवळपास दहा लाख जुळ्या मुलांचा जन्म झाल्यावर अशी एक घटना समोर येण्याची शक्यता असते. या प्रकरणात, त्या महिलेने अगदी थोड्या वेळेच्या फरकाने दोन्ही पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले असावेत, ज्यामुळे दोन्ही मुलांचे वडील स्वतंत्र पुरुष आहेत. डीएनएच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की या दोन्ही मुलांची आई एकच आहे परंतु वडील मात्र वेगळे आहेत. सध्या डेंग याजुन यांनी पत्नीविरोधात व्यभिचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

चीनमध्ये याआधीही असेच एक प्रकरण समोर आले होते ज्यामध्ये जुळ्या मुलांचे वडील या वेगळ्या व्यक्ती होत्या. त्यावेळी महिलेने सांगितले होते की,तिने एका रात्री वन नाईट स्टँड केले आणि नंतर घरी येऊन आपल्या पतीशीही संबंध ठेवले. २०१९ मध्ये चीनमधील झियामेन शहरात असा प्रकार उघडकीस आला होता.

खरं तर, अशा परिस्थितीत मुलाच्या कायदेशीर वडिलांचे नाव नोंदविण्यात बरीच अडचण येते, कारण डीएनएच्या अहवालानुसार दोन मुलांचे वडील वेगळे आहेत. या प्रकरणात, आपल्या दोन मुलांपैकी एकाच्या दिसण्यामुळे वडिलांना संशय आला आणि डीएनए चाचणी करण्यात आली. या प्रकरणात, त्या व्यक्तीने फक्त आपल्या मुलास ठेवले आणि ते दुसरे मूल वाढविण्यास नकार दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment