प्राचीन कलाकृती की चमत्कार? ही विहीर पाहिल्यावर तुम्हीही व्हाल थक्क

wishing well
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भटकंती करणारी लोक ही कोणत्याही कसल्याही कोपऱ्यात जाऊन google वरही न सापडणारी ठिकाणे शोधून काढतात. हे ठिकाणे आश्चर्यचकित आणि थक्क करून सोडणारी असतात. नुकतच असंच एक ठिकाण समोर आले आहे. सिन्तारामध्ये (Sintra) असणाऱ्या या ठिकाणाचं नाव इनिटिएशन वेल आहे. या ठिकाणी असलेली एक विहीर सर्वांनाच थक्क करून सोडत आहे. असे या विहिरीत काय आहे आपण जाणून घेऊयात.

सिन्तारामध्ये असलेल्या या विहिरीला अनेकजण विशिंग वेल (Wishing Well) असे म्हणतात. का तर ही विहीर प्रत्येकाची इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. परंतु सर्वात खास गोष्ट म्हणजे, या विहिरीतून एक उजेड बाहेर येतो. या विहिरीची बांधणी तशी केली आहे की? विहिरीमध्ये उजेड पडतो. त्यामुळे सर्वांनाच या गोष्टीचे आश्चर्य वाटते. कारण कोणत्याही विहिरीमध्ये उजेड हा पडत नाही. पण ही विहीर आगळीवेगळी आहे.

सिन्ताराची ही विहीर तब्बल चार मजली आहे. ती प्रचंड खोल देखील आहे. परंतु तरीदेखील वरून पडलेल्या उजेडाल्यामुळे विहीर किती खोल आहे याचा अंदाज बांधता येतो. अनेकजण असेही मानतात की, काही कारणांमुळे या विहिरीला असे बनवण्यात आले असावे. तर काहीजण याला अद्भुत कलाकृती समजतात. परंतु ही विहीर कोणत्या काळात कधी बांधली याबाबत कोणतीही माहिती आढळत नाही.