Oukitel WP35 : 11000mAh च्या महाशक्तीशाली बॅटरीसह लाँच झालाय हा स्मार्टफोन; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या या टेक्नॉलॉजीच्या जगात बाजारात सतत नवनवीन मोबाईल येत असतात. ग्राहकांच्या सुद्धा अपेक्षा वाढत असून नवं काहीतरी मोबाईलमध्ये असावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत तुम्ही स्लिम मोबाईल, फोल्डेबल मोबाईल बघितले असतील परंतु आता प्रसिद्ध कंपनी Oukitel ने मार्केट मध्ये अतिशय मजबूत आणि रग्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. Oukitel WP35 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तब्बल 11000mAh ची महाशक्तीशाली बॅटरी देण्यात आली आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेऊयात …..

6.6-इंचाचा डिस्प्ले –

Oukitel WP35 मध्ये 6.6-इंचाचा 2.4K डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आलंय जे डायमंड पॅटर्न स्टाईलमध्ये बनवले आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity chipset बसवली असून यामध्ये अल्ट्रासेव्ह ३.०+ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. मोबाइलमध्ये 8 GB रॅम असून हि रॅम 24 GB पर्यंत वाढवता येते. हा मोबाईल कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही.

कॅमेरा – Oukitel WP35

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Oukitel WP35 मध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा नाईट व्हिजन कॅमेरा आणि समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 11000mAh बॅटरी दिली असून हि बॅटरी 60 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देऊ शकते. Oukitel च्या या मोबाईलला मजबुती दर्शवणारे IP68, IP69K, आणि MIL-STD-810H प्रमाणपत्र मिळालं आहे.

किंमत किती?

Oukitel WP35 ची किंमत $179.99 (अंदाजे रु. 15,000) आहे. हे AliExpress वरून खरेदी केले जाऊ शकते. येत्या 13 मे पासून मोबाईलच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. 13 ते 17 मे दरम्यान हा स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यावर अतिरिक्त डिस्काउंट मिळेल असेही सांगण्यात आले आहे.